पंजाबराव डख यांच्या उपस्थितीत जय भवानीच्या गळीत हंगामाचा शुभारंभ*

*पंजाबराव डख यांच्या उपस्थितीत जय भवानीच्या गळीत हंगामाचा शुभारंभ*
××××××××××××××××
*उपस्थित राहण्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांचे आवाहन*
जय भवानी सहकारी साखर कारखान्याच्या ४० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवार दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. या प्रसंगी सुप्रसिध्द हवामान अभ्यासक पंजाबराव डख, श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. महंत शिवाजी महाराज, कारखान्याचे संस्थापक शिवाजीराव पंडित यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूक ठेकेदार यांचेसह कारखान्याचे हितचिंतक यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे.
गेवराई तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जय भवानी सहकारी साखर कारखान्याच्या ४० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवार दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. महंत शिवाजी महाराज यांच्या शुभहस्ते व कारखान्याचे संस्थापक शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी मुख्य अतिथी म्हणून सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते, सरपंच, चेअरमन यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
जय भवानी साखर कारखान्याची गाळप क्षमता अडीच हजार हुन पाच हजार मेट्रिक टन प्रति दिन वाढविल्या नंतर हा पहिलाच गळीत हंगाम सुरू होत आहे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून यंत्रसामुग्री मध्ये बदल करण्यात आले आहेत, मागिल वर्षी सर्वाधिक गाळपाचा विक्रम प्रस्थापित करून ऊसाला रास्त भाव दिला असल्यामुळे शेतकरी आनंदात आहे. कामगारांनी अहोरात्र मेहनत घेऊन गाळप क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या पार्शवभूमीवर सोमवारच्या कार्यक्रमाला महत्व आहे. उत्कृष्ठ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह शेतकऱ्यांचा सत्कार यावेळी होणार आहे.
गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास सर्व ऊस बागायतदार, ठेकेदार, कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे.
अमरसिंह पंडित विजयसिंह पंडित
रनवीरसिंह पंडित