देश-विदेश

संत निरंकारी मिशनच्या वतीने देशव्यापी ‘स्वच्छ जल स्वच्छ मन’ अभियान

संत निरंकारी मिशनच्या वतीने देशव्यापी ‘स्वच्छ जल स्वच्छ मन’ अभियान

 

संत निरंकारी मिशनच्या वतीने देशव्यापी ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियान

नीरा नर्सिंगपूर, सातारा, कराड, वाई या चार ठिकाणी होणार रविवारी साफसफाई

 

संत निरंकारी मिशनमार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात रविवारी (ता. २६) ‘अमृत परियोजने’ अंतर्गत ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

‘जल संरक्षण’ आणि ‘जल बचाव’ करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करुन ते कार्यान्वित करणे हा या परियोजनेचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये जलाशयांची स्वच्छता आणि स्थानिक जनतेमध्ये जागृती अभियान राबवून जनसामान्यांना प्रोत्साहित करणे हा या परियोजनेचा केंद्रबिंदू आहे.

या परियोजने अंतर्गत संत निरंकारी मिशन सातारा झोन मधील त्रिवेणी घाट- नीरा नर्सिंगपूर, तसेच संगम माहुली – सातारा, प्रिती संगम – कराड, गणपती घाट- वाई इत्यादी परिसरात साफसफाई करण्यात येणार असल्याचे सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांनी सांगितले.

बाबा हरदेवसिंहजी यांनी आपल्या कार्यकालात समाज कल्याणाचे अनेक उपक्रम राबवले. त्यामध्ये स्वच्छता व वृक्षारोपण अभियान यांची सुरवात प्रमुख आहेत. त्यांच्याच शिकवणूकीतून प्रेरणा घेत दरवर्षी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशनानुसार विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून यावर्षी अमृत परियोजनेचे आयोजन करण्यात येत आहे.

संत निरंकारी मिशनचे सचिव आदरणीय श्री.जोगिन्दर सुखीजाजी यांनी या परियोजनेविषयी विस्तृत माहिती देताना सांगितले, की ही परियोजना संपूर्ण भारतभरात २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ७३० शहरांमध्ये जवळपास १००० ठिकाणी राबविण्यात येणार आहे.

त्यामध्ये प्रामुख्याने आंध्र प्रदेश, अंदमान व निकोबार द्वीप समूह, आसाम, बिहार, चंदीगड, छत्तीसगड, दीव दमन, दिल्ली, गुजरात, गोवा, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडु, तेलंगाना, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल इत्यादींचा समावेश आहे.

 

दीड लाख स्वयंसेवक सहभागी

या परियोजनेअंतर्गत निरंकारी मिशनचे सुमारे दीड लाख स्वयंसेवक समुद्रकिनारे, नद्या, सरोवरे, तलाव, विहीरी, झरे, पाण्याच्या टाक्या, नाले आणि जलप्रवाह इत्यादिंची स्वच्छता करुन ते निर्मळ बनवतील तसेच जल संरक्षणाची प्रेरणा देतील. मिशनच्या जवळ जवळ सर्व शाखा यामध्ये सहभागी होतील आणि आवश्यकतेनुसार अनेक शाखा निर्धारित क्षेत्रामध्ये एकत्र येऊनही सामूहिक रूपात हा उपक्रम राबवतील.

ही परियोजना पर्यावरण संतुलन, प्राकृतिक सौंदर्य आणि स्वच्छतेसाठी केला जाणारा एक प्रशंसनीय व स्तुत्य प्रयास आहे. वर्तमान काळात आपण अशा प्रकारच्या लोक कल्याणकारी परियोजना राबवून आपल्या या सुंदर धरतीला नुकसानीपासून वाचवू शकतो तसेच प्राकृतिक संसाधनांच्या अनावश्यक वापरावरही अंकूश लावू शकतो.

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे