मराठी भाषा सर्वकष व समृद्ध असल्याने जगभरात मराठीचा गजर -कुताळ
मराठी भाषा सर्वकष व समृद्ध असल्याने जगभरात मराठीचा गजर -कुताळ
श्रीरामपुर-मराठी भाषेत सर्व प्रकारचे साहित्य प्रकार उपलब्ध असल्याने ती सर्वंकष आणि समृद्ध आहे.त्यामुळे संपूर्ण जग मराठी भाषेचा गजर आणि जागर करीत असल्याचे प्रतिपादन पत्रकार व वात्रटिकाकार नवनाथ कुताळ यांनी केले आहे.
मॉडेल इंग्लिश स्कुल येथे मराठी गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते त्या निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्या तृप्ती करीर होत्या.यावेळी मराठी गौरव पिठावर संस्थेच्या अध्यक्षा मैमकौरजी सेठी,संचालक रतनसिंगजी सेठी, बलजीत कौरजी सेठी,उपमुख्याध्यापक विनोद जोशी,यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.
उपप्राचार्य जोशी,सुतार आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.नवनाथ कुताळ पुढे म्हणाले की मॉडेल इंग्रजी माध्यमाची शाळा असतानाही फक्त इंग्रजीचाच विचार न करता मराठी भाषाही समृद्ध ठेवली आहे.यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी साहित्य ग्रंथ दिंडी काढली होती.तर पोवाडे,कविता,पंढरीची वारी अन भजने, स्फूर्ती गीते आदींसह मराठी साहित्य प्रकारातील वैविध्यपूर्ण सादरीकरण करून बाल पिढीतही मराठी भाषा कशी समृद्ध आहे हे दाखवुन दिले.
स्वागत आयुष बागूल याने,परिचय कार्तिक आसने या विद्यार्थांनी तर प्राची सुर्यवंशी, तन्मय खटाणे,ओम शिंदे,अभिराज लोंढे यांनी मनोगत,कविता,पोवाडा सादर केला.विद्यार्थ्यानी ग्रंथदिडी,शिवाजी महाराज,विठ्ठल रूख्मिनी ,लेझिम,’होता जीवा म्हणून वाचला शिवा’ यावर आधारीत पोवाडा, असे साहित्याचे अनेक पैलू सादर केले. आर्या लोंढे व आर्यन सरोदे यांनी सूत्रसंचालन केले तर आयुष बागुल याने स्वागत केले शेवटी विराज चौधरी याने आभार मानले.