डोंगराला अज्ञात व्यक्तीने लावली आग

वडगाव ढोक शिवारातील डोंगराला अज्ञात व्यक्तीने लावली आग
गेवराई तालुक्यातील खंडोबा डोंगरात कडील साईट ते वडगाव ढोक शिवारातील डोंगराला आज (दि,२८ फेब्रुवारी) रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आग लावली आहे. या आगीमुळे डोंगरावर चरायला गेलेले जनावरे गावाच्या दिशेने पळू लागले. वडगाव शिवारामध्ये काय फॉरेस्ट डोंगर आहे त्यामध्ये बबन रामभाऊ कडपे हे वाचमन आहेत कडपे यांनी काही माणसं हाताखाली धरून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला परंतु थोड्याच वेळात आगीने संपूर्ण डोंगर व्यापला होता. खंडोबा शिवारात असणारा हा डोंगर हिरवळीने नेहमीच नटलेला असतो. शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी खाद्याची व्यवस्था या डोंगरामुळे पूर्ण होत असते. परंतु आज अचानक अज्ञान व्यक्तीने या डोंगराला आग लावण्यात आली. आणि पाहाता पाहाता संपूर्ण डोंगरावर आगीचे लोळ पाहायला मिळाले.
आगीची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाईचा करण्यात येईल असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले