महाराष्ट्र

-डाँ.मुजफ्फर शेख यांच्या इंग्रजी कथासंग्रहाचे दिमाखात झाले प्रकाशन

-डाँ.मुजफ्फर शेख यांच्या इंग्रजी कथासंग्रहाचे दिमाखात झाले प्रकाशन

 

बेलापूर पुणेस्थित ख्यातनाम साहित्यिक डाॕ.मुजफ्फर सलिम शेख यांच्या ‘हिज वाईफ्स लव्हर अॕण्ड अदर स्टोरीज’या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदारपणे संपन्न झाला.यावेळी त्यांच्या निवडक इंग्रजी कविता आणि त्यांच्या मराठी अनुवादाचे प्रकट वाचनही झाले. बेलापूरचे रहिवासी असणारे डाॕ.मुजफ्फर शेख हे इंग्रजी,उर्दू तसेच मराठीचे ख्यातनाम साहित्यिक आहेत.त्यांनी अशोक पब्लिक स्कूल,पुना काॕलेज आॕफ आर्टस,काॕमर्स अँड सायन्स तसेच सोदी अरेबियातील रियाध येथील किंग सौदी युनिव्हर्सिटीच्या कम्युनिटी काॕलेज मध्ये प्राध्यापक म्हणून काम केले आहे.त्यांचे आजवर अनेक कथा व काव्यसंग्रह,अनुवादित पुस्तके प्रकाशित झालेली आहे.आज त्यांच्या ‘हिज वाईफ्स लव्हर अँड अदर स्टोरीज’ या नविन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बेलापूर येथील संस्कृती मंगल कार्यालयात ल.ना.डोखे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी जेष्ठ ग्रामिण साहित्यिक नामदेवराव देसई ,शहनाज मुजफ्फर शेख,रिजवान शेख,किश्वर शेख आदि प्रमुख उपस्थित होते. प्रकाशन सोहळ्यानंतर डाॕ.मुजफ्फर शेख यांनी त्यांच्या इंग्रजी व या कवितांचे मराठीत अनुवाद करणारे भास्कर खंडागळे यांनी निवडक कवितांचे प्रकट वाचन केले.त्यास उपस्थितांनी उत्फुर्त दाद दिली.यावेळी जेष्ठ साहित्यिक नामदेवराव देसाई लक्ष्मण डोखे ,शरद सोमाणी,हैदरभाई सय्यद यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास जि.प.सदस्य शरद नवले,सरपंच महेन्द्र साळवी,उपसरपंच अभिषेक खंडागळे ,माजी सरपंच भरत साळुंके,सुनिल मुथा,रणजीत श्रीगोड,बापुसाहेब पुजारी,भास्कर बंगाळ,शारदाताई खरात,पञकार मारुतराव राशिनकर,देवीदास देसाई,महेश माळवे,अनिल पांडे,प्रकाश कुलथे.नवनाथ कुताळ,विष्णुपंत डावरे, दिलीप दायमा,अॕड.विजय साळुंके,साहित्यिक डाॕ.गुंफा कोकाटे ,डाॕ.बाबुराव उपाध्ये,डाॕ.संतोष पवार,डाॕ.आदिनाथ जोशी,पोपटराव पटारे, संगीता फासाटे,भागवत मुठे,खंडेराव गवांरे,नंदा गवांरे,रामचंद्र राऊत,मनोज ओझा,राजन भोसले,प्रकाश पा. नाईक,साहेबराव वाबळे,भरत सोमाणी,पुरुषोत्तम भराटे,अॕड.पंडीतराव बारहाते,डाॕ.गोरख बारहाते,हरिभाऊ काळे,अजय नाईक,संपत बोरा,शशिकांत नाईक,प्रकाश कुमावत,डाॕ.सुधीर काळे,सचिन कडेकर,योगेश खरात,रमेश खरोटे,आतिष देसर्डा,अनिल छाबडा,तान्हाजी शेलार, आदिंसह डाॕ.मुजफ्फर यांचे शालेय वर्गमिञ सर्वश्री किशोर जोशी,नंदकुमार टेकाळे,देवराम शिंदे,सुदिनकुमार नाईक,भास्कर लोखंडे,गणपत देवकर,सोपान भालेराव,कांतीलाल संचेती,बन्सी पगारे,गोरख उंडे,सुरेश मंञी,शिवाजी नवले,मग्बुल शेख, उपस्थित होते.भास्कर खंडागळे यांनी प्रास्तविक केले तर सलिम शेख यांनी सूञसंचलन केले.डाॕ.मुजफ्फर व त्यांचे परिवाराचा बेलापूर ऐज्युकेशन सोसायटीच्या वतीने जे.टी.एस.हायस्कूल जेथे डाॕ.मुजफ्फर यांचे शालेय शिक्षण झाले तेथे हृद्य सत्कार करण्यात आला.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे