श्रीगोंद्यात मोहरम साजरा

श्रीगोंद्यात मोहरम साजरा
श्रीगोंदा : श्रीगोंद्यातील सुफी संत शेख महंमद बाबा दर्गाह मध्ये पारंपारीक पद्धतीनुसार ताबुत (ताजीया ) ची स्थापना करण्यात येते.
रविवार दि. ३१ जुलै २०२२ रोजी शेख महंमद बाबा यांच्या दरबारात ताबुत (ताजीया ) ची स्थापना करण्यात आली होती.
तर शहरात जावेद फ कीर, राजु मनियार, झुंबरराव गोरे, बादशहा मालजप्ते, महंमद शेख, लालु मनियार, डॉ. मनियार आदिंनी सवारी पंजाची स्थापना केली होती.
आज मोहरमची १० वी तारीख, रविवार दि. ०९ ऑगस्ट रोजी ताबुत (ताजीया ) ची शेख महंमद बाबा यांचे वंशज शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट चे अध्यक्ष,दैनिक सिटीझनचे संपादक अमीनभाई शेख, बंडूभाई शेख, अल्ली शेख, राजू शेख, चाँद शेख, फ रहान शेख यांनी विधीवत पुजा करुन शहरातील पं.स. वसाहतीतील विहीरीत सायंकाळी विर्सजण करण्यात आले.
पो.नि.ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.