कृषीवार्तामहाराष्ट्र

प्रसाद शुगरकडील फरकाची ऊस बिले मिळण्याचा मार्ग मोकळा

शेतकरी संघटनेच्या सलग चार वर्षांच्या संघर्षाचे यश

 

प्रसाद शुगरकडील फरकाची ऊस बिले मिळण्याचा मार्ग मोकळा

 

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांचे उपस्थितीत कारेगाव येथे ऊस उत्पादकांची कृतज्ञता सभा

 

श्रीरामपूर :- सन २०१८-१९ च्या गाळप हंगामात श्रीरामपूर, नेवासा व परिसरातील शेतकऱ्यांनी प्रसाद शुगर कारखान्यास पुरवठा केलेल्या सुमारे एक लाख टन ऊसाला असमान दर दिल्याच्या मुद्द्यावर शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पटारे यांचे नेतृत्वाखाली सलग चार वर्षांच्या संघर्षाला अखेर यश आले असून, फरकाची प्रतिटन २२१/- रुपये रक्कम एकसमान पद्धतीने अदा करण्याचे आदेश साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड यांनी प्रसाद शुगर कारखान्यास दिल्याने ऊस उत्पादकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रसाद शुगर कारखान्याने या हंगामात राहुरी परिसरातील ऊस उत्पादकांना प्रतिटन २३२१/- रुपये दर देऊन उर्वरित ऊस उत्पादकांची प्रतिटन २१००/- रुपयांमध्येच बोळवन केली होती.

          माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याचिका क्रमांक ४१६२/९८ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार एकाच हंगामात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना वेगवेगळे दर देता येणार नाही या निकालाचा आधार घेऊन शेतकरी संघटनेने कारखाना कार्यस्थळ, प्रादेशिक सहसंचालक कार्यालय, तसेच कारखान्याचे अध्यक्ष यांचे घरासमोर शेतकऱ्यांचा मोर्चा काढून आंदोलने केली होती. आंदोलनाची दखल घेऊन साखर आयुक्तांनी उभयपक्षी सुनावणी घेतली. याप्रकरणी साखर आयुक्तांनी शासनाच्या विधी व न्याय विभागाचेही अभिप्राय व मार्गदर्शन घेतले व त्यानुसार फरकाची प्रतिटन २२१/- रुपयाप्रमाणे रक्कम हंगामातील सर्व ऊस उत्पादकांना एकसमान दराने अदा करण्याचे प्रसाद शुगर कारखान्यास आदेश दिले.

          या आंदोलनास शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले. या पार्श्वभूमीवर उद्या गुरुवार ,दिनांक ११ऑगस्ट रोजी सकाळी ठिक :०९ .०० वाजता कारेगाव येथे ऊस उत्पादकांच्या शेतकरी कृतज्ञता सभेचे आयोजन केले असून, ऊस उत्पादकांना संबोधित करण्यासाठी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीनाना नांदखिले यांचेहि मार्गदर्शन लाभणार आहे. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अहमदभाई जहागीरदार, जिल्हा उपाध्यक्ष विलास कदम, जिल्हा संघटक भास्करराव तुवर, जिल्हा ऊस उत्पादक आघाडीचे जगन्नाथ कोरडे, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप, नेवासा तालुका अध्यक्ष हरीअप्पा तुवर, राहुरी तालुका अध्यक्ष नारायणराव टेकाळे, श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष राजेंद्र कदम, युवा आघाडीचे तालुका उपाध्यक्ष संदीप उघडे, नेवासा तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब शिरसाठ, राहुरी तालुका उपाध्यक्ष अमोल मोढे, शिवाजीराव कवडे आधी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन ऊस आंदोलन समितीचे निमंत्रक व शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पटारे, ऊस आंदोलन समितीचे संजय नामदेवराव उंडे, साहेबराव पा.पटारे, मारूतराव पा.पटारे, संजय पा. कवडे, संजीव रायभान उंडे, नामदेवराव गायके, काशिनाथ पा.शिरोळे, श्रीकृष्ण वेताळ, निळकंठ उंडे, वाल्मीकराव भोसले, योगेश उंडे, रमेश पटारे सर, हरीश पटारे, द्वारकानाथ जोशी, आप्पासाहेब पटारे, राहुल उंडे, नानासाहेब पटारे तसेच शेतकरी संघटनेच्या कारेगाव शाखेचे अशोकराव पटारे, मनोज हेलवडे, मोहनराव जगताप, अहमदभाई शेख, महेश लवांडे, जयदीप पटारे, सुनील तऱ्हाळ, सोपानराव गोरे, विठ्ठल माळी, लक्ष्मणराव साळवे आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे