स्वच्छता मोहिमेत गाव पुढाऱ्यांनी सहभाग घ्यावा कानोबा खंडागळे

स्वच्छता मोहिमेत गाव पुढाऱ्यांनी सहभाग घ्यावा कानोबा खंडागळे
टाकळीभान चे उपसरपंच कानोबा खंडागळे यांच्या पुढाकाराने, स्वच्छता मोहीम करणाऱ्या साठी, गाव पुढार्यांसाठी सुवर्णसंधी ,स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे, तरी गाव पुढाऱ्यांनी या सुवर्णसंधीचा फायदा घेऊन स्मशानभूमी स्वच्छता अभियान मध्ये सहभाग घ्यावा,
सध्या टाकळीभान स्मशानभूमी दुर्गंधी वाढली होती, त्यामुळे कानोबा खंडागळे यांनी टाकळीभान मशानभुमी स्वच्छता मोहीम सुरू केली ,तरी सर्व गाव पुढाऱ्यांना सहभाग घेऊन स्वच्छता मोहीम राबवावी ,आठवड्यातून एक दिवस धार्मिक स्थळे,शाळा,अंगणवाडी,दवाखाने,शासकीय इमारत परिसर या ठिकाणी स्वच्छता मोहिम करण्यात येणार असून धार्मिक स्थळे, स्मशानभूमी,शाळा अंगणवाडी,दवाखाने,शासकीय इमारत परिसर या ठिकाणी तणनाशक फवारणी सुरु करण्यात आली असून,प्रभाग क्रमांक १ ते ६ या प्रभागात डास निर्मुलन फवारणी तसेच प्रभाग क्रमांक १ ते ६ मधील रस्त्यालगतचे उकिरडे व झाडे – झुडपे ही काढण्याची मोहीम लवकरच सुरु करण्यात येईल , स्वच्छता मोहिमेत सर्वानी सहभागी व्हावे, असे आव्हान उपसरपंच कानोबा खंडागळे यांनी केले आहे,