महाराष्ट्र

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती

 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव श्रीगोंदा शहराच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात जयंती उत्सव धुमधडाक्यात साजरी करण्यात आली .यावेळी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सकाळी ध्वजारोहणाचा व अभिवादनाचा कार्यक्रम मा जिल्हा परिषद सदस्या सौ प्रतिभाताई पाचपुते,नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, तालुका वैद्यकीय अधिकारी नितीन खामकर, महाराजा जिवाजीराव विद्यालयाचे प्राचार्य मस्के सर, नगराध्यक्ष शुभांगी पोटे, उपनगराध्यक्ष संग्राम घोडके व नगरसेवकांच्या हस्ते पार पडला तसेच शहरात लहान मुली व मुलांचा लेझीम पथकाचा मनमोहक देखावा पाहण्यास मिळाला तसेच शांततेच अण्णाभाऊंच्या गजरात मिरवणूक पार पडली दुपारी प्रसिद्ध गायक सोनू साठे यांचा जंगी गायनाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमास तालुक्यातून थोर जेष्ठ महिला लहान मुले मुली यांचा कार्यक्रम पाहण्यास सहभागी होते..सायंकाळी भव्य लेझर शोचा देखावाही करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे व पारनेर मतदार संघाचे आ निलेश लंके यांच्या सौभाग्यवती रानीताई लंके या होत्या.. आमदार लहू कानडे यांनी मार्गदर्शनपर बोलताना म्हटले की, अण्णाभाऊ साठेंसह पुरोगामी चळवळीतील अनेक महामानवांनी समाजासाठी यातना सहन केल्या आहेत. त्यांच्या संघर्षातून आपल्याला सन्मानाचे जीवन मिळाले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लहुजी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णा भाऊ यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपण पुढे मार्गक्रमण केले पाहिजे. त्यांनी सांगितलेले संदेश आपण अमलात आणले पाहिजेत अश्या प्रकारे आ. कानडे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रचा उलगडा केला.तसेच या कार्यक्रमाला मा आ राहुल जगताप स.म.शि.ना.स.कारखान्याचे चेरमन राजेंद्र नागवडे,मा.जिल्हा परिषद सदस्या प्रतिभाताई पाचपुते, जिल्हा परिषद सदस्य अनुराधाताई नागवडे, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, उपनगराध्यक्ष संग्राम घोडके, गटनेते मनोहर पोटे, कृषी बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, हृदय घोडके, निसार बेपारी,प्रशांत गोरे, सतीश मखरे, संतोष कोथंबिरे, बापूतात्या गोरे, अशोक खेंडके, रमेश लाढाणे, शहाजी खेतमाळीस,समीर बोरा,नाना कोथिंबीरे,संतोष क्षीरसागर, उपस्थित होते तसेच या जयंतीचे विशेष आयोजन व मेहनत मा नंदकुमार ससाणे यांनी केले तसेच या कार्यक्रमाला नंदकुमार भाऊ ससाणे,भगवानराव गोरखे, वसंत सकट,अनिलभैय्या ,ससाणे दशरथ तुपे (गुरुजी ), संदीप उमाप, रतन ससाणे,मनोज घाडगे,किशोर नेटके,नितीन ससाणे, सोपान ससाणे,पप्पू आढागळे,राजू ससाने, प्रा संदिप ससाणे,चंद्रकांत सकट,    

शिवा घोडके, भीमराव उल्हारे, मुकुंद सोनटक्के,डॉ.घोडके, लक्ष्मण घोडके, जितेंद्र पाटोळे, अनिल रोकडे, कुणाल शिरवाळे, जिवा घोडके,ज्ञानदेव शिरवाळे, बापू गायकवाड, नवनाथ शिंदे,संतोष शिंदे,संतोष गोरखे,संतोष शेंडगे,आबा तोरडमल, अनिल तुपे

गणेश तुपे बिजु तपे अशोक खवळे किरण तुपे अमित ससाणे,भूषण घाडगे,तृषाल ससाणे,सचिन वायदंडे,संदिप ससाणे, काळू ससाणे, भाऊ तुपे अक्षय नंदू ससाणे,गणेश ससाणे मीनाताई सकट, आशाताई सकट , पुष्पा शेडंगे रेखा ससाणे पुणे ,व श्रीगोंदा तालुक्यातील व शहरातील सर्व पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते..कार्यक्रमाचे आभार तालुक्याच्या वतीने मा नगरसेवक अनिलभैय्या ससाणे ,किशोर नेटके,नितीन ससाणे यांनी मानले..यावेळी पोलीस बंदोबस्त चोख होता ,

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे