राजकिय

*आ शिरसाटांची जीभ घसरली! म्हणाले, ठाकरेंच्या बाजूच्या 4 **व्यांना हाकला…*

*आ शिरसाटांची जीभ घसरली! म्हणाले, ठाकरेंच्या बाजूच्या 4 **व्यांना हाकला…*

शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यापासून एकमेकांवरती आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी मुंबईत मेळावा घेत शक्तिप्रदर्शन केले. त्यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊतांवर एकेरी आणि शिवराळ भाषेत टीका केली. यावेळी बोलताना शिरसाट म्हणाले की गेली 38 वर्षे मी शिवसेनेत आहे. बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळी शिवसेनेचा उमेदवार हरला तर ते फक्त एक ग्लास दूध प्यायचे… पण आज काही लोक रोज सकाळी उठून शरद पवारांकडे जातात अशी टीका संजय शिरसाट यांनी राऊतांवरती केली आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये रात्रीची सभा घेण्याची ताकद आहे. जी आजपर्यंत कुणामध्ये दिसली नाही. शिवसेनेत यामिनी जाधवांना मिळालेली वागणूक कशी चुकीची आहे, हे सांगताना पक्षासाठी गेली अनेक वर्षे घातली यांना किमान आजार पणात तरी विचारायला हवे, असे एकेरी भाषेत उल्लेख करत संजय शिरसाटांनी टीकास्त्र डागले आहे. तर जे 4 **वे बाजूला बसले आहेत, त्या 4 **व्यांना हाकला असे म्हणताना संजय शिरसाटांची जीभ घसरली होती.

 

ज्या लोकांनी शिवसेनेसाठी काही केले नाही ते आम्हाला शिवसेना शिकवत आहे. ते आम्हाला निष्ठा काय असते सांगताना मी रिक्षा चालक मुख्यमंत्री रिक्षा चालक पण बाळासाहेबांनी आम्हाला आमदार केले, या पुढे मी आमदार राहिले काय नाही काय असे म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली. तुमच्याकडे केवळ इनकमिंग आहे आमच्याकडे देणारे लोक आहे, अशी दाणत ठेवा असे म्हणत पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे