
मुख्य कार्यकारी अधिकारी लंगोरे यांची टाकळीभानला सदिच्छा भेट
टाकळीभान येथे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. लंगोरे साहेब यांनी ग्रामपंचायत कार्यालय टाकळीभान येथे घरकुल योजनेचा आढावा घेण्यासाठी व भूमी शोध अभियानासाठी सदिच्छा भेट दिली आणि मार्गदर्शन केले.
यावेळी ज्या नागरिकांना स्व मालकीची जमीन नाही त्यांना राहत्या शासकीय जागेवरच घरकुल योजनेचा लाभ मिळावा अशी आग्रही मागणी केली. घरकुल यादीसाठी शासनाने घालून दिलेल्या काही जाचक अटींमुळे अनेक लोक या योजनेपासून वंचित आहेत त्या अटी शिथिल कराव्या जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना ह्या योजनेचा लाभ मिळेल तसेच लवकरात लवकर यादीत समाविष्ट असलेल्या सर्वांना लाभ द्यावा अशी विनंती केली.
यावेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मा. धस साहेब, विस्तार अधिकारी मा. चाऱ्हाटे भाऊसाहेब, विस्तार अधिकारी मा. अभंग भाऊसाहेब, प्रभारी ग्रामविकास अधिकारी मा.श्री ढुमने भाऊसाहेब, सरपंच, अर्चनाताई रणवरे, उपसरपंच, कानोबा खंडागळे, सदस्य मयूर पटारे ,मोहन रणवरे ,सुनील त्रिभुवन ,विलास सपकाळ, विलास दाभाडे ,व ग्रामस्थ उपस्थित होते.
Rate this post