गुन्हेगारी

त्या’ अवैध गर्भपात प्रकरणात भल्या पहाटे दाखल झाला गुन्हा

त्या’ अवैध गर्भपात प्रकरणात भल्या पहाटे दाखल झाला गुन्हा

 

 

बीड: तालुक्यातील बक्करवाडी येथे शितल गाडे ही महिला अवैध गर्भपातामुळे दगावली होती. या प्रकरणात आता ५ व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे. तब्बल तीन दिवसांच्या तपासानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. 

रविवारी (दि.५) रोजी बक्करवाडी ता. बीड येथील शितल गाडे ही ३० वर्षीय महिला दगावलेल्या अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. तिचा अवैध गर्भपात झाल्याचे समोर आल्यानंतर जिल्हयात खळबळ माजली होती. या प्रकरणात स्वत: जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी लक्ष घातल्यानंतर पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांनी तपासाची चक्रे वेगाने हलविली. यात मंगळवारी चौघांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी पहाटे या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक महादेव ढाकणे यांच्या फिर्यादीवरुन मयताचा नवरा गणेश गाडे, सासरा सुंदरराव गाडे भाऊ नारायण निंबाळकर, यासह मध्यस्थ महिला मनिषा सानप आणि सिमा सिस्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांसह पीसीपीएनडीटी आणि एमटीपी कायद्यातील विविध कलमांखाली हा गुन्हा दाखल झाला आहे.

 

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे