वाळू वाहतूक करणारा ढंपर पलटी होऊन ढंपर चालकाचा ढंपर खाली दबून दुर्दैवी मृत्यू

वाळू वाहतूक करणारा ढंपर पलटी होऊन ढंपर चालकाचा ढंपर खाली दबून दुर्दैवी मृत्यू
राहुरी तालूक्यातील महालगाव येथे प्रवरा नदी पात्रात सुरू असलेल्या वाळू उत्खनन ठिकाणी वाळू वाहतूक करणारा ढंपर पलटी होऊन ढंपर चालकाचा ढंपर खाली दबून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक २८ मे रोजी घडलीय. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
राहुरी तालूक्यातील महालगाव येथे काही दिवसांपासून प्रवरा नदी पात्रात जेसीबी सारख्या मशनरीचा वापर करून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू आहे. आज सकाळी साडे अकरा वाजे दरम्यान ढंपर चालक दत्तात्रय राजू लष्करे हा वाळूने भरलेला ढंपर घेऊन जात असताना ढंपर पलटी झाला. दत्तात्रय लष्करे हा ढंपर खाली सापडून चिरडला गेला. त्याला तातडीने श्रीरामपूर येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डाॅक्टरांनी त्याला मयत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली.
महालगाव येथे सुरू असलेला वाळू लिलाव हा कायदेशीर असला तरी प्रशासनाकडून घालून दिलेल्या नियम अटींचे उल्लंघन करून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. सदर लिलाव बंद करण्यासाठी आरपीआय आठवले गटाचे तालूकाध्यक्ष विलासनाना साळवे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार दिवसांपासून राहुरी येथील तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणास सुरू आहे. महसूल प्रशासनाने उपोषणाची दखल घेऊन वेळीच कारवाई केली असती तर आज दत्तात्रय लष्करे या तरूणाचा जिव गेला नसता. या घटने बाबत सदर वाळूचा लिलाव घेतलेल्या ठेकेदाराला जबाबदार धरून त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी आरपीआय तालुकाध्यक्ष विलासनाना साळवे यांनी केली आहे.