कोंढवड येथे जिजाऊ महिला ग्रामसंघाची स्थापना

कोंढवड येथे जिजाऊ महिला ग्रामसंघाची स्थापना
राहुरी प्रतिनिधी : तालुक्यातील ब्राम्हणी प्रभागातील कोंढवड येथे महिला स्वयंसहाय्यता समुहांच्या अध्यक्षा, सचिव व सदस्यांनी प्रभाग समन्वयक अशोक खोमणे, राणी पगारे व सीआरपी राधिका म्हसे यांच्या उपस्थितीत एकत्र येत जिजाऊ महिला ग्रामसंघाची स्थापना केली आहे.
२४ मे २०२२ रोजी कोंढवड येथील सर्व महिला स्वयंसहाय्यता समुहांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस क्रांतीसेनेचे राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, सुरेश म्हसे, बार्टीचे समता दुत एजाज देशमुख, एचडीएफसी बँकेचे सोनवणे, महिला क्रांतीसेनेच्या अध्यक्षा भारतीताई म्हसे, विमल म्हसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत ब्राम्हणी प्रभाग समन्वयक राणी पगारे यांनी उपस्थित महिलांना उमेद अभियान, दशसुत्री, खेळते भांडवल, बँक कर्ज इ. विषयी मार्गदर्शन केले तर सात्रळ प्रभाग समन्वयक अशोक खोमणे यांनी महिलांना ग्रामसंघ महत्त्व, रचना, पदाधिकारी व उपसमित्या, लिपीका तसेच पीएमएफएमई, पीजी ग्रुप, एमआयटी आदी विषयांवर मार्गदर्शन केले. या बैठकीत जिजाऊ महिला ग्रामसंघ कोंढवड ची स्थापना करण्यात आली. या ग्रामसंघाच्या अध्यक्षपदी वैशाली सचिन म्हसे, सचिवपदी सुप्रिया म्हसे, कोषाध्यक्षपदी भारती पवार व लिपीका म्हणुन उमा म्हसे यांच्यासह गटमुल्यांकन समितीत रोहिणी संभाजी म्हसे, रूपाली म्हसे, पुजा म्हसे, रोहिणी म्हसे, बँक जोडणी समितीत सरिता म्हसे, प्रतिभा औटी, मेघा म्हसे, मंजुश्री म्हसे, सुक्ष्म नियोजन आराखडा समितीत मंगल म्हसे, अनुराधा म्हसे, शांता म्हसे, शोभा म्हसे, सामाजिक मुल्यमापन समितीत मंगल म्हसे, कमल म्हसे, जिजाबाई म्हसे, उमा पवार आदींच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी अरुणा म्हसे, पुष्पा म्हसे, लक्ष्मी म्हसे, कांचन म्हसे, रुपाली शरद म्हसे, अस्मिता बोरुडे, सुरेखा म्हसे आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.