*5 वर्षाच्या चिमुरडी वर अत्याचार.. आळंदी पोलिस यांनी तत्काळ कारवाई करत आरोपीस ठोकल्या बेड्या.

*5 वर्षाच्या चिमुरडी वर अत्याचार.. आळंदी पोलिस यांनी तत्काळ कारवाई करत आरोपीस ठोकल्या बेड्या.
आळंदी पोलिस यांनी 5 वर्षाच्या चिमुरडी वर अत्याचार झालेचा गुन्हा दाखल करत नराधम इसमास तत्काळ जेरबंद केले आहे. माणुसकी ला काळींबा फासणाऱ्या आरोपीचे नाव सचिन बाळू शेंडे वय 32 वर्ष.राहणार मूळ गाव. शेंडे वाडी.कडूस ता. खेड असून तो सध्या आळंदीतील मरकळ रोड वर रहात होता.फिर्याद देणारीचिमुरडीची आई असून. मुलगी बापा जवळ जाताना खुप घाबरली असलेची लक्षात आले असता मुलीच्या आईला संशय आला.सदर चिमूरडी अत्यवस्थ असताना अमृत हॉस्पिटल मध्ये मारहाण झाली म्हणुन दाखल असताना . तेथील डॉक्टर यांना प्रकरण वेगळं आहे असा संशय आला. त्यांनीं आळंदी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर साबळे यांना संपर्क करत लक्ष घालण्याची विनंती केली. असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक साबळे यांनी तत्काळ सूत्र हलवत पी एस आय दर्जाच्या अधिकारी असलेले बी एम गोंधळे यांना पाठवत माहिती घेतली .मुलीच्या सावत्र आई ने या गुन्हा स वाचा फोडण्याचे धाडस केले. गुन्हा दाखल करत 31 मे पर्यंत आरोपीस पोलिस कस्टडी ची मागणी आळंदी पोलिस यांनी केली होती. पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून. तपासी अंबलदार पोलीस नाईक कुऱ्हे. तसेच आळंदी देवाची पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर साबळे पुढील तपास करत आहेत. दरम्यान आरोपीच्या मुसक्या अवळत आरोपीची रवानगी आळंदी पोलिस यांनी पोलीस कोठडीत केली आहे.