गुन्हेगारी

श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी मध्ये जागा हडपण्याचा प्रयत्न.

श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी मध्ये जागा हडपण्याचा प्रयत्न.

 

श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी येथील कैलास मारुती कांबळे यांच्या मालकीच्या गट नंबर 8 मध्ये खिर्डी व वांगी बुद्रुक येथील लोकांनी दमदाटी करून अतिक्रमण करून पत्र्याच्या साह्याने टपऱ्या तयार करून व्यवसाय चालू केले सबंधित 1) दत्तू कुंडलिक कांबळे 2) योगेश क्षीरसागर 3)श्रीधर कापसे यांनी अवैधरित्या अतिक्रमण करून दुकाने थाटली त्यानंतर दिनांक 22 मे रोजी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान कारेगाव येथील एक जेसीबी व त्यांच्या ट्रॅक्टरने कुठून तरी शासनाचा महसूल बुडवून मुरुम चोरी करून आणला व कैलास मारुती कांबळे यांच्या शेतात आणून जागा हडपण्याचा उद्देशाने टाकत असताना कैलास कांबळे यांच्या शेतात काम करणारे दत्तू माधव कांबळे यांनी ते पाहिले असता ते म्हणाले की आमच्या शेतात मुरूम का टाकता यावरून वरील तीनही आरोपींनी व जेसीपी व ट्रॅक्टर चालक मालक यांनी त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली त्यांनी या प्रकाराबद्दल श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिलेली आहे.

 

शहरात जमीन, जागा हडपण्याचा प्रकार बऱ्याचदा उघड झालेले आहेत. ग्रामीण भागातही आता हे प्रकार चालू झाल्याने दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.

 

अवैधरीत्या जमिनीवर किंवा जागेवर कब्जा केल्याने कैलास कांबळे यांना धक्काच बसलेला आहे. त्यांनी तात्काळ याबाबत उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर, श्रीरामपूर तहसिलदार यांना लेखी तक्रारी अर्ज देऊन कळवले आहे की माझ्या गट नंबर  8 मध्ये अवैधरित्या वरील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी बाहेरील गुंड लोकांना हाताशी धरून माझ्या जमिनीवर कुठलाही अधिकार नसताना दमदाटी करून कब्जा केलेला आहे. व बाहेरून कुठून तरी चोरट्या पद्धतीने मुरूम आणून टाकून माझ्या मालकीची जमीन हडपण्याचा प्रयत्न चालू आहे. याबाबत कल्पना दिली आहे. तसे लेखी तक्रारी अर्ज देखील दिलेला आहे.

 

या प्रकरणात संबंधित शासकीय महसूल व पोलिस यंत्रणा काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे