डॉ दादासाहेब तनपुरे कृषी फलोत्पादन प्रक्रिया सहकारी संस्थेला उत्कृष्ट खत विक्रेते म्हणून राज्यात प्रथम क्रमांक

डॉ दादासाहेब तनपुरे कृषी फलोत्पादन प्रक्रिया सहकारी संस्थेला उत्कृष्ट खत विक्रेते म्हणून राज्यात प्रथम क्रमांक
राहुरी येथील डॉ दादासाहेब तनपुरे कृषी फलोत्पादन प्रक्रिया सहकारी संस्थेला उत्कृष्ट खत विक्रेते म्हणून राज्यात प्रथम क्रमांक मिळाला मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या 63 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष संतोष ताराचंद तनपुरे व उपाध्यक्ष गोरक्षनाथ सयाजी खडके यांनी पुरस्कार स्वीकारला राज्य सहकारी पणन महासंघाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग अहमदनगर जिल्हा मार्केटिंग अधिकारी एच एल पवार खत विभाग प्रमुख एस बी चंद्रे पणन महामंडळाचे अधिकारी या वार्षिक सभेस उपस्थित होते डॉ दादासाहेब तनपुरे कृषी फलोत्पादन प्रक्रिया सहकारी संस्थेने उत्कृष्ट रासायनिक खतांची उच्चांकीने विक्री केली असल्याने त्यांना हा प्रथम क्रमांक देण्यात आला.
माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली संस्था कार्यरत आहे गेल्या अनेक वर्षापासून संस्था रासायनिक खतांची विक्री करते शेतकऱ्यांचाही विश्वास संस्थेने जोपासला आहे त्यातूनच उच्चांकी खत विक्री झाली आहे या कार्याची महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाने दखल घेऊन उत्कृष्ट खत विक्रेते म्हणून गौरविले आहे संस्थेच्या या यशाबद्दल राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे माजी नगराध्यक्ष डॉ उषाताई तनपुरे यांनी अभिनंदन केले आहे संस्थेचे सचिव नामदेव गेनुजी काळे यांनी. उत्कृष्ट नियोजन करत संस्थेला बहुमान मिळवून दिला.