बेलापुर भाजपात मतभेद असल्याचे जिल्हाध्यक्ष गोंदकर यांच्या समोर उघड

बेलापुर भाजपात मतभेद असल्याचे जिल्हाध्यक्ष गोंदकर यांच्या समोर उघड
बेलापुर – भाजपाचा बालेकिल्ला म्हणून कधी काळी ओळख असलेल्या बेलापुरात भाजपाच्याच जिल्हाध्यक्षांना भाजपाचे दोन गट आमने सामने असल्याचा अनुभव आला दोन्ही कार्यकर्ते आपलेच पण ऐकावे कुणाचे? अशी अवस्था जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांची झाली होती कर्मयोगी मुरलीधर खटोड यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधुन खटोड पतसंस्थेच्या वतीने भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या उपस्थितीत हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते आपले नेते गावात येणार म्हणून भाजपाचे सरचिटणीस प्रफुल्ल डावरे पुरुषोत्तम भराटे यांनी बेलापुर ग्रामपंचायत कार्यालयात जिल्हाध्यक्ष यांच्याच अनुमतीने त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात केले होते कार्यक्रमाच्या आयोजकांना ही बाब माहीती होताच आगोदर शाळेतीला कार्यक्रम विनाकारण वाढविण्यात आल्याचा आरोप डावरे व भराटे यांनी केला बेलापुर ग्रामपंचायत कार्यालयात त्यांच्या सत्काराची तयारी करुन जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे सह भाजपाचे सरचिटणीस प्रफुल्ल डावरे पुरुषोत्तम भराटे कुंभकर्ण आदिसह अनेक कार्यकर्ते चार वाजेपासुनच भाजपाचे जिल्हाध्यक्ष गोंदकर यांची वाट पहात ग्रामपंचायत कार्यालयात थांबले होते परंतु जिल्हाध्यक्ष गोंदकर यांना वक्तृत्व स्पर्धेच्या कार्यक्रमातच उशीर झाला कार्यक्रम आटोपल्यानंतरही ते एका खाजगी ठिकाणी गेले ही वार्ता डावरे यांच्या कानी पडताच ते त्या ठिकाणी गेले व जिल्हाध्यक्ष गोंदकर यांना ग्रामपंचायत कार्यालयात येण्याचा आग्रह धरला परंतु आमचा कार्यक्रम आहे पाहुणे आम्ही आणले कुठे न्यावयाचे ते आम्हीच ठरविणार असे ठणकावुन सांगितले त्या वेळी सुनिल मुथा यांनी थोडा वेळ देण्याचा आग्रह धरला गोंदकर यांनी मान्य केले व वादावर पडदा पडला असे वाटत असतानाच आयोजकांनी गोंदकर यांना सरळ कार्यक्रम स्थळी नेले त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात थांबलेले कार्यकर्ते संतापले त्यांनी जिल्हाध्यक्ष गोंदकर यांना फोन करुन दोन मिनीट का होईना येण्याची विनंती केली त्यावर दिप प्रज्वलन करुन आलोच असे सागुन ते दिप प्रज्वलन करुन स्टेजवरुन खाली उतरले आणी ते थेठ ग्रामपंचायत कार्यालयात आले त्या वेळी भाजपाचे प्रफुल्ल डावरे यांनी आम्ही कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढविणारे सच्चे कार्यकर्ते आहोत आपणास विचारुनच सत्काराचे नियोजन केले होते तरीही काय घडले हे आपल्या समोरच आहे आपणच निर्णय घ्यावा अशी विनंती केली यावर जिल्हाध्यक्ष गोंदकर यांनी सुनिल मुथासह आपण सर्व जण एकत्र बसुन चर्चा करु असे सांगुन ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेला सत्कार स्विकारुन ते पुन्हा कार्यक्रम स्थळी पोहोचले कै मुरलीधर खटोड यांच्या स्मृती दिनानिमीत्त आयोजित हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम सुरळीत पार पडला त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी परिसरातुन मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते