महाराष्ट्र
रविराज तुकाराम पा. गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थांना फळे वाटप

रविराज तुकाराम पा. गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थांना फळे वाटप
सोनई :- आज गुरुवार दि. १७/१०/२०२४ रोजी श्री हनुमान ग्रामीण विकास व संशोधन मंडळ पानसवाडी या संस्थेचे सचिवसाहेब व युवा नेते श्री रविराज तुकाराम पाटील गडाख यांचा वाढदिवस शाळेतील विद्यार्थ्यांच्या बरोबर साजरा करण्यात आला. यावेळी त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच त्यांना विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते आदर्श विद्या मंदिर सोनई या विद्यालयात शाळेतील २००० विद्यार्थ्यांना केळी वाटप करण्यात आले त्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री दरंदले सर व श्री खेसमाळसकर सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते