शिवजयंती निमित्त सोनईत भव्य रक्तदान शिबीर…..यांनी केले नियोजन.

शिवजयंती निमित्त सोनईत भव्य रक्तदान शिबीर…..यांनी केले नियोजन.
अंखड भारताचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त सोनई गावात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अहमदनगर येथील अर्पण ब्लड बॅकच्या वतीने डाॅ.भाग्यश्री पवार व त्यांचा संपुर्ण स्टाफने दिवसभर 65 रक्तदात्यांचे रक्तदान घेतले.यावेळी दिवसभरात युवक रक्तदात्यांनी मोठा सहभाग नोंदवला.शिव जयंती निमित्त सोनई परिसरातील शिव भक्तांनी शिव जयंती निमित्त केलेल्या या विधायक रक्तदान शिबीराचे मोठे कौतुक सोनई परिसरात झाले.सामाजिक संघटना व दानशुर व्यक्तींनी यावेळी चहा,बिस्किट,केळी व नास्त्याची सोय यावेळी केली होती.सकाळी स्वामी विवेकानंद चौकात छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळाचे पुजन करून पोवडा गायन व मिरवणुक काढण्यात आली.यावेळी सोनई परिसरातील सर्व मिञ मंडळानी यात उत्फुर्त प्रतिसाद दाखवला.
यावेळी सोनई येथील छावा संघटना,स्वामी विवेकानंद चौक मिञ मंडळ,शिवगर्जना ग्रुप,शंभो युवा प्रतिष्ठाण,सुनिलभाऊ गडाख युवा फाॅडेंशन सोनई,सत्यमेव जयते आरोग्य फाॅडेशन भारत,अर्पण ब्लड बॅक अहमदनगर यांच्या वतीने रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी स्वयःसेवकांनी मोठे परिश्रम घेतले.