महाराष्ट्र

चितळेरोड मित्र मंडळाच्या शहरात आलेल्या कष्टकरी कामगारांना धान्यवाटप

चितळेरोड मित्र मंडळाच्या शहरात आलेल्या कष्टकरी कामगारांना धान्यवाटप

 

शिवरायांनी ‘रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका’ हे आदेश आजही पाळायची गरज – शभम झिंजे

 

                          छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकरी व सर्वसामान्य माणसांचे रक्षणकर्ते होते. त्यांनी आपल्या सैनिकांना स्पष्ट आदेश दिले होते कि, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. अन्नधान्य, वैरण आदी माल लागला तर तो विकत घ्या.शिवरायांच्या पुर्वी लढाईला निघालेले सैनिक शेतकरी व सामान्य जनतेला अक्षरश: लुटत होते. पण शिवरायांच्या राज्यात सामान्य रयत सुरक्षितता अनुभवत होती. एखादा तरूण शिवरायांकडे आला तर ते त्यास बी बियाणे,बैलजोडी व जमिन देत होते. त्याने कष्ट करून उदरनिर्वाह करावा म्हणून ते त्यास प्रोत्साहन देत होते. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सुचना दिल्या होत्या कि शेतकऱ्याचे चांगले चालल्याशिवाय त्यांच्याकडून टॅक्स घेऊ नका.आजच्या तरूणाईने शिवरायांच्या विचारावर काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन चितळेरोड मित्र मंडळाचे शुभम झिंजे यांनी केली.

 

                       मंडळातर्फे नेहरू मार्केट येथे शहरात आलेल्या कष्टकरी सामान्य जनतेस धान्यवाटप व गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ ग्रंथ वाटप प्रसंगी ते बोलत होते.शिवजयंतीचे औचित्य साधून मंडळातर्फे गरजूंना धान्यवाटपाचा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. कोरोना नैसर्गिक आपत्ती संकटकाळात सामान्य जनता भरडली गेली. लोकांचे रोजगार गेले,नोकऱ्या गेल्या. शहरात आलेल्या परजिल्हा व परराज्यातील कष्टकरी कामगारांना मंडळाकडून आज धान्यवाटप करण्यात आले.

 

                       यावेळी मंडळचे अध्यक्ष व अहमदनगर हॉकर्स संघटनेचे संजय झिंजे, हॉकर्स संघटनेचे शाकीर शेख, निलेश रोकडे,’नवा मराठा’चे सुभाष गुंदेचा,मराठा सेवा संघाचे इंजी.अभिजीत एकनाथ वाघ, सिटूचे कॉ. प्रा. डॉ. महेबुब सय्यद, इतिहासप्रेमी मंडळाचे असिफखान दुलेखान, रामभाऊ धोत्रे,शरद मडूर,ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या समृध्दी वाकळे,भैरवनाथ वाकळे, आनंद प्रेसचे डॉ. सुहास कवडे, दत्त बेकरीचे सुधीर परदेशी,पॅपीलॉन’चे अजय झिंजे,अनिकेत झिंजे,नितीन ताठे,शादाब सय्यद,वसंत गुगळे, अरूण खिच्ची,रामान्ना गालपेल्ली, सुनिल नागपुरे,भागचंद कोकाटे,मुन्ना तांबोळी,राजाभाऊ चौधरी,पिंटू कोंडके,बाळासाहेब रोकडे,बालाजी गौरी,रत्नाकर कोंडके 

 

 आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

                   शिवजयंतीचे औचित्य साधून मंडळातर्फे चितळेरोड मित्र मंडळाच्या शहरात आलेल्या परजिल्हा व परराज्यातील कष्टकरी कामगारांना गरजूंना धान्यवाटपाचा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे