क्रिडा व मनोरंजन
प्रज्वल नवले याची शिवविचार जागर आणी चर्चासत्रामध्ये निवड.

प्रज्वल नवले याची शिवविचार जागर आणी चर्चासत्रामध्ये निवड.
परिवर्तन फाऊंडेशन सांगोला आयोजीत
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील युवा शाहीर प्रज्वल नवले याची शिवजयंती उत्सवा निमित्ताने परिवर्तन फाऊंडेशन सांगोला आयोजीत शिवविचार जागर आणी चर्चासत्रामध्ये दि. १९ रोजी झुम मिटींगद्वारे प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळाली आहे.
शनिवार दि. १९ फेब्रूवारी रोजी शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून परिवर्तन फाऊंडेशन सांगोला आयोजीत शिवविचार जागर व चर्चासत्र यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श आणी त्यांचे विचार तसेच आजच्या तरूणाईच्या मनातले महाराज या विषयावरती चर्चासत्र आयोजीत केलेले आहे. या चर्चासत्राची वेळ सायंकाळी ४ वाजेची असून या चर्चासत्रात युवा शाहीर प्रज्वल नवले याची झुम मिटींगद्वारे प्रमूख पाहुणे म्हणून निवड झाली आहे. त्याच्या या निवडीचे शिवप्रेमीसह सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे