नोकरी
सरकारी नोकरी मिळविणे सोपे मात्र टिकविणे जबाबदारीचे—पो. उपनिरीक्षक.सुरवाडे

सरकारी नोकरी मिळविणे सोपे मात्र टिकविणे जबाबदारीचे—पो. उपनिरीक्षक.सुरवाडे
सरकारी नोकरी मिळविणे सोपे आहे. पण ती टिकविणे जबाबदारीचे काम आहे. जनहितासाठी त्यागाची भूमीका असावी. मात्र नोकरीत उन्मतपणा करू नये असे प्रतिपादन पो.उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांनी केले आहे.
ते व्हिज्युअल अभ्यासिकाच्या वतीने येथील पोलीस क्षेत्रात नव्याने सेवेसाठी पाच भूमीपुत्राचा सत्कार करण्यात आला यावेळी सुरावडे बोलत होते. अध्यक्षस्थानी विनोद रणनवरे हे होते.
यावेळी सहाय्यक पो.नि. जीवन बोरसे, व्हिज्युवलचे संचालक महेश शिंदे, प्रशांत जाधव, माजी सभापती नानासाहेब पवार, काॅग्रेसचे जिल्हा सचिव माऊली काॅग्रेसचे राजेंद्र कोकणे, संजय पटारे, संभाजी पटारे, उपस्थित होते.
पुढे बोलताने बोरसे म्हणाले की, वाचण संस्कृती जोपासणे काळाची गरज आहे. असे सांगत वाचाल तर वाचाल असे ते यावेळी म्हणाले.
सहाय्यक पो.नि. जीवन बोरसे पुढे बोलताने म्हणाले की, आपले आयुष्य घडविण्यासाठी व्हिज्युवल अभ्यासीका ही एक पायरी आहे. आपल्या समोर या माध्यमातून पाण्याची विहीर आहे. त्यातून किती पाणी आपण घ्यायचे हे आपण आपले ठरावे. त्याच पध्दतीने व्हिज्युअलच्या माध्यमातून आपल्यापुढे ज्ञानाचे भांडार खुले केले आहे. त्याचा पुरेपुर वापर करून आपण आपले भविष्य घडवावे. असे आवाहन यावेळी केले.
या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात विनोद रणनवरे म्हणाले की, अभ्यास करताने सातत्य ठेवणे गरजेचे आहे. कुठलीही अडचण आली तरी त्यास सामोरे जाणे गरजेचे आहे. सध्यस्थितीत सोशल मिडीयावर वेळ खर्ची करण्यापेक्षा ते अभ्यासात घालवावे. असे ते म्हणाले.
याप्रसंगी प्रा.जयकर मगर सर संजय पटारे, सुंदर रणनवरे, सत्कारमुर्ती नितिन पटारे, राहुल जाधव, प्रमोद रणनवरे, गणेश पटारे, महेश बडाख, आदीसह प्रशिक्षणार्थी विद्यार्थी सर्व पत्रकार व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक व सुत्रसंचालन अर्जून राऊत यांनी तर आभार प्रा. जयकर मगर यांनी मानले