ब्रेकिंग

कोपरे गावात दोन्हीही जगताप  कुटुंबाच्या मारहाणीच्या एकमेकाविरुद्ध फिर्यादी दाखल

कोपरे गावात दोन्हीही जगताप  कुटुंबाच्या मारहाणीच्या एकमेकाविरुद्ध फिर्यादी दाखल

सिताराम जगताप यांना तसेच त्यांच्या कुटुंबाला आरोपींनी काहीएक कारण नसताना शिवीगाळ करुन लोखंडी पाईप व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. ही घटना राहुरी तालुक्यातील कोपरे येथे दि. ३ जुलै रोजी सकाळच्या सुमारास घडली.

सिताराम बबन जगताप, वय ५५ वर्षे, रा. कोपरे, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, सिताराम जगताप यांचा भाऊ भरतुरीहरी जगताप हा सिताराम जगताप यांच्या शेजारीच राहवयास असुन त्यांचे नविन घराचे बांधकाम चालु आहे.

दि. ३ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.१५ वाजे दरम्यान सिताराम जगताप यांचे शेताजवळच घराचे बांधकाम चालु होते. तेथे आरोपी आले व बांधकामावरील काम करणारे गवंडी कामगारांना शिवीगाळ करू लागले. तेव्हा सिताराम जगताप हे आरोपींना समजावुन सांगत असताना आरोपींनी सिताराम जगताप, त्यांची पत्नी, दोन मुले व भाऊ यांना शिवीगाळ करुन लोखंडी पाईपने तसेच लाथाबुंक्यानी मारहाण केली.

तसेच तुम्ही आमचे परत नादी लागले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. घटनेनंतर सिताराम बबन जगताप यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी भगिरथ देवराव जगताप, आरूण भगिरथ जगताप, भारत भगिरथ जगताप, दादा भाऊसाहेब जगताप, सर्व रा. कोपरे, ता. राहुरी, यांच्यावर गुन्हा रजि. नं. ७४०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३५२, ३५१ (२), ११५ (२), ११८ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

तर दुसरी फिर्याद

काहीएक कारण नसताना आरोपींनी दोघा बाप लेकाला शिवीगाळ करुन लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दि. ३ जुलै रोजी सकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील कोपरे येथे घडली. 

भरतकुमार भगिरथ जगताप, वय ३२ वर्षे, हे राहुरी तालुक्यातील कोपरे येथे राहत असून त्यांच्या जमीनी शेजारीच सिताराम बबन जगताप याचे शेत व घर असुन ते त्यांचे कुटूंबासह तेथे राहतात. दोघांचा कोर्टामध्ये दावा चालु आहे. दि. ३ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास भरतकुमार जगताप हे घराचा वाद सुरु असलेल्या जागेत बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी गेले. 

तेव्हा भरतकुमार जगताप यांनी आरोपींना विचारले की, काय झाले, तेव्हा आरोपींनी काहीएक कारण नसताना भरतकुमार जगताप व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने मारहान केली. तसेच तुम्ही परत येथे आले तर तुम्हाला लोखंडी रॉडने जिवेच मारून टाकू, अशी धमकी दिली.

भरतकुमार भगिरथ जगताप यांच्या फिर्यादीवरून आरोपी सिताराम बबन जगताप, भर्तृहरी बबन जगताप, महेश सिताराम जगताप, योगेश सिताराम जगताप, मिनाक्षी सिताराम जगताप, सुनिता भर्तृहरी जगताप, सर्व रा. कोपरे, ता. राहुरी, यांच्यावर गुन्हा रजि. नं. ७४१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १८९ (१), १९१ (१), १९१ (३), १९०, ११८ (१), ११५ (१ ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

5/5 - (1 vote)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे