राजकिय
अशोक च्या निवडणुकित टाकळीभान केंद्रामध्ये …….

अशोक च्या निवडणुकित टाकळीभान केंद्रामध्ये …….
श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु अशोक सहकारी साखर कारखान्याची सन २०२१-२०२६ साठी दिनांक 16 जानेवारी रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये टाकळीभान केंद्रामध्ये 715 सभासदांपैकी 666मतदारांनी हक्क बजावला. 93 टक्के उचांकी मतदान झाले असून मातब्बर उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. लोकसेवा मंडळ विरुद्ध शेतकरी संघटना अशी सरळ लढत होऊन दोन्ही पॅनल कडून एकास एक उमेदवार दिले होते. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याला उद्याच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. सत्ताधारी लोकसभा मंडळाचे नेतृत्व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्याकडे होते तर विरोधी शेतकरी संघटनेचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे अजित काळे , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीसअविनाश आदिक, जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी केले आहे. उद्याच्या निकालाची उत्सुकता लागली आहे.