माजी खासदार प्रसाद तनपुरे यांची मागणी राज्यातील पाणी वापर संस्था बरखास्त करून…….
जलसंपदामंत्री जयवंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

माजी खासदार प्रसाद तनपुरे यांची मागणी राज्यातील पाणी वापर संस्था बरखास्त करून…….
शेती सिंचन व्यवस्थापन पूर्ववत जलसंपदा विभागाकडे देण्यात यावे अशी मागणी ज्येष्ठ नेते माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
श्री तनपुरे यांनी निवेदनात म्हटले आहे की राज्यातील धरणांमधून शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत सिंचन व्यवस्थापनामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग असावा व पाण्याचा काटकसरीने वापर करून उपलब्ध पाण्यामध्ये जास्तीत जास्त सिंचन व्हावे असे शासनाला अपेक्षित होते परंतु या पाणी वापर संस्था स्थापन झाल्यापासून व सिंचन व्यवस्थापन त्यांच्याकडे देण्यात आल्यापासून शेतकऱ्यांकडून तातडीने व सातत्याने तक्रारी येत होत्या या संस्थांकडे शासनाची पाणीपट्टीची मोठी रक्कम थकलेली आलेली आहे तसेच त्यांचे आर्थिक नियोजन ही पूर्णपणे कोलमडले असून काही संस्था अवसायनात निघालेल्या आहेत परिणामी चाऱ्या व उपचाऱ्या दुरुस्तीची कामे कित्येक वर्षात होऊ शकलेली नाही त्यामुळे पाण्याचा ही मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे तसेच या संस्थांकडे सध्या आवश्यक ते कर्मचारीही उपलब्ध नाही यामुळे जलसंपदा विभागाकडे पाण्याची मागणी नोंदवली जात नाही परिणामी शेतकऱ्यांच्या सिंचनामध्ये अडचणी येत आहेत पाणी वापर संस्था बरखास्त करुन सिंचन व्यवस्थापन पूर्ववत जलसंपदा विभाग यांच्याकडे देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने होत आहे शेतकऱ्यांच्या या मागणीचा प्राधान्याने विचार करून पाणी वापर संस्था बरखास्त करण्याबाबत तसेच सिंचन व्यवस्थापन पूर्ववत जलसंपदा विभागाकडे देण्याबाबत उचित कार्यवाही चे आदेश व्हावेत असे निवेदनात श्री तनपुरे यांनी नमूद केले आहे.