नेवासा- गणेशवाडी परिसरात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ….

गणेशवाडी परिसरात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ….
गणेशवाडी –नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे सध्या शेळ्या चोरीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे .अनेक दिवसांपासून गावात मध्ये चोऱ्यांचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शेळ्या, दुचाक्या, जनावरे, घरफोडी या सारख्या चोऱ्या अनेक दिवसांपासून परिसरात सध्या सुरू आहे.एकाच दिवशी चोरट्यांनी संजय दरंदले, आंधळे, दरंदले , बेल्हेकर यांच्या प्रत्येकी दोन याप्रमाणे सुमारे एक लाख रुपये किंमतीच्या शेळ्यांची चोरी केली. तरी पोलीस प्रशासन मात्र या सर्व गोष्टींबाबत तोंडावर बोट हातावर घडी असे झाले आहे. पोलीस प्रशासन देखील चोरट्यांचा बंदोबस्त करण्याकामी अपयशी ठरत आहे. परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात सध्या चोरीचे सत्र सुरू असताना देखील पोलीस प्रशासनास पत्रकारांनी या बाबत विचारणा केली असता आम्हाला त्याबद्दल काही एक माहिती नाही असे सांगून हात वरती करतात. यावरून पोलीस प्रशासन किती कुचकामी ठरत आहे हे सिध्द झाले आहे. पोलीसांत जाऊन देखील आपल्या चोरीचा तपास लागत नसल्याने अनेक जण नको त्या कटकटी यामुळे पोलीस्टेशनला न गेलेलेच बरे असे पवित्रा घेतात. या सर्वांना सध्या सुरू असलेले अवैध धंदे च जसे वाळू, दारू, मटका, जुगार चंदन तस्कर यासारखे धंदे च कारणीभूत असल्याचे परिसरात चच्रीले जात आहे. तरी या अवैध धंद्यांना पोलीसांनी चाप लावून झालेल्या चोऱ्यांचा तपास त्वरित लावावा अशी मागणी केली जात आहे
प्रतिनिधी, सोनई
मोहन शेगर