राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेततळ्याचे 2वर्षा पासून अनुदान प्रलंबित असलेले 55 शेतकऱ्यांची 27 लाख रुपये रक्कमचे धनादेशाचे वाटप

राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेततळ्याचे 2वर्षा पासून अनुदान प्रलंबित असलेले 55 शेतकऱ्यांची 27 लाख रुपये रक्कमचे धनादेशाचे वाटप
आज माजी खासदार प्रसाद तनपुरे ह्यांचे हस्ते व कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी विलास नलगे व तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे ह्यांचे उपस्थित करण्यात आला.
कृषी विभागाचे वतीने मागेल त्याला शेततळे ह्या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना 2019 /20 ह्या सालातील 55 शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
कोरोनाचे काळात शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे ह्या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी शेततळे तयार केले होते त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यासाठी लागणारे साहित्य उधारीवर व्यापारी वर्गाकडून आणले होते. शेततळे पुर्ण केले पण त्याच्या अनुदानची रक्कम शासनाने 2 वर्षा पासून प्रलंबीत असल्याने लाभार्थी शेतकरी ह्यांनी ह्याबाबत माजी खासदार प्रसाद तनपुरे व राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे ह्यांचे कडे सदर रक्कम मिळण्यासाठी निवेदने दिली समक्ष भेट घेतली. कोरोनामुळे शेतकऱ्यांसाह सर्व जण आर्थिक अडचणीत सापडल्याने सदर रक्कम त्वरित शेतकऱ्यांना द्यावी ह्यासाठी पाठपुरावा केला.श्री तनपुरे ह्यांच्या या प्रयत्नास यश येऊन कृषी विभागास सदर रक्कम प्राप्त होताच तालुक्यातील 55 शेतकऱ्यांना आज धनादेशाचे वाटप माजी खासदार प्रसाद तनपुरे व उपविभागीय अधिकारी विलास नलगे ह्यांचे हस्ते करण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे ह्यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संजय गांधी योजनेचे अध्यक्ष कोंडीराम पुंजाजी वडितके ,मंडळ कृषी अधिकारी जयंत जाधव , मंडळ कृषी अधिकारी राहुल ढगे, उपस्थित होते.सदर कार्यक्रमास 55 शेतकऱ्यांना रक्कम रुपये 27 लक्ष अनुदानाचे वितरण कोरोनाच्या नियमांचे पालन करून करण्यात आले.
राहुरी प्रतिनिधी
अशोक मंडलिक