वांगी बुद्रुक ग्रामपंचायत ड यादी वरून पुन्हा वादळी

वांगी बुद्रुक ग्रामपंचायत ड यादी वरून पुन्हा वादळी
30 12 2019 रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये कोरम पूर्ण न झाल्याने ग्रामसभा तहकूब करण्यात आली होती या ग्रामसभेमध्ये सुद्धा यादीवरून चांगलाच वादळ सुरु होते ठकाजी पिसाळ व विलास कांबळे यांनी प्रश्न मांडला होता की अंधाधुंद कारभारामुळे गरजू नागरिकांना व ग्रामपंचायत हेवे दावे करून गरजू व्यक्तींना घरकुल देण्यास टाळाटाळ करून त्यांच्या घरांची नोंद ही पक्क्या घरांची लावण्यात आल्याने गरजू घरकुल लाभार्थी वंचित राहिल्याने अखिल भारतीय मानव अधिकार मिशन अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री धनंजय माने यांनी मुद्दा उपस्थित केला होता की यादी घरकुल सर्व चुकीच्या पद्धतीने झाल्याचे निदर्शनास आले त्यामुळे सर्वे फेरसर्वे करण्यात यावा याबाबत माने यांनी पंचायत समिती श्रीरामपूर बिडी ओ यांना लेखी निवेदनही देण्यात आले तहखूप झालेल्या ग्रामसभा नंतर 5/12/2022रोजी पुन्हा ग्रामसभा घेण्यात आले त्या ग्रामसभा मध्ये चुकीच्या पद्धतीने अपात्र झालेले नागरिकही फार प्रमाणात उपस्थित असल्याने अनेकांचे प्रश्न वेगवेगळे होते त्यास ग्रामपंचायत ग्रामसेविका यांनी रेकॉर्ड प्रमाणे माहिती पुरवली परंतु सरपंच सासरे व ग्रामस्थांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाल्याचे दिसून आले याचे कारण की यादी सर्वे 2018 2019 याची माहिती ग्राम पंचायत, सरपंचाकडे उपलब्ध नसल्याचे ग्रामसभेस सांगितल्यानंतर उपस्थित अपात्र लाभार्थ्यांना मध्ये चांगलीच संतापाची लाट उसळली त्यातच ड यादी सर्वे दोन हजार सोळा सतरा च्या यादीमध्ये यांची नावे नाहीत त्यांची नावे पात्र अपात्र यादी मध्ये असल्याने नागरिक संतप्त होऊन बोलते झाले की आंधळ दळतंय कुत्र पीठ खातय अशी अवस्था वांगी बुद्रुक ग्रामपंचायतीची झाली आहे नागरिकांची फसवणूक होत आहे की काय हे ग्रामस्थांना समजायला तयार नसल्याने अखिल भारतीय मानवधिकार मिशन जिल्हा अध्यक्ष लवकरच कोर्टामध्ये दोषींवर कारवाई होण्यासाठी जाणार असल्याचं समजते यावेळी ग्रामसभेसाठी मोठ्या संख्येने पात्र-अपात्र नागरिक उपस्थित होते