राजकिय
अशपाक पप्पा मिया शेख यांची, रयत शेतकरी संघटना नेवासा तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती

टाकळीभान — नेवासा तालुक्यातील अशपाक पप्पा मिया शेख यांची, रयत शेतकरी संघटना नेवासा तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अॅड. रविप्रकाश देशमुख ,यांचे आदेशानुसार प्रदेश अध्यक्ष मारोतराव मगर व प्रदेश कार्याध्यक्ष तय्यब पटेल, प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर, व प्रदेश सल्लागार अरूण खुंटे, कुलकर्णी तसेच महिला प्रदेशाध्यक्ष नयना गवळी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख संजय पाटील चौधरी यांच्या नेतृत्वाखाली व उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा सुनीता जाधव यांच्या शिफारशीनुसार यांची रयत शेतकरी संघटनेचे नेवासा तालुका उपाध्यक्ष या पदावर अशपाक पाप्यामिया शेख नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे