लोकसेवा मंडळाचा टाकळीभान येथे प्रचार शुभारंभ…

टाकळीभान: अशोक सहकारी साखर कारखाना निवडणूक रणधुमाळी सुरू
टाकळीभान येथे सोमवार दिनांक 3 जानेवारी रोजी लोकसेवा मंडळाचा प्रचार नारळाचा शुभारंभ लोकसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय मगर होते,
या वेळी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, यांनी आपल्या भाषणात अजित काळे यांना, सहकारी संस्थेचा अनुभव आहे का, व एखादी पिठाची गिरण चालवले चा अनुभव आहे, का असे शिंदे म्हणाले ,दिगंबर बारस्कर ,भारत भवार, भास्कर मुरकुटे, सखाहरी शिंदे आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केली. यावेळी ज्ञानदेव साळुंके, दत्तात्रय नाईक रामकृष्ण पवार, रामकृष्ण मैड, कान्हा खंडागळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, मयुर पटारे, पाराजी पटारे,सुनील बोडखे, गणेश कोकणे, बाबासाहेब नवघणे, रेवननाथ कोकणे , भाऊसाहेब कोकणे,अशोक पटारे, एकनाथ लेलकर, दादासाहेब पटारे, घोगरगाव चे सरपंच पती सदाशिव बहिरट, आदीसह घोगरगाव ,पिंपळगाव सह टाकळीभान येथील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी टाकळीभान गटातील उमेदवार लोकसेवा मंडळाच्या वतीने घोषित करण्यात आले. टाकळीभान सर्वसाधारण गट-भानुदास मुरकुटे ( कमलपूर) ज्ञानदेव पटारे ( घोगरगाव) अमोल कोकणे (बेलपिंपळगाव) ओबीसी मतदार संघ-पुजारी शिंदे (भोकर) महिला राखीव- हिराबाई साळुंके(टाकळीभान) अनुसूचित जाती जमाती-यशवंत रणनवरे(टाकळीभान) यांची उमेदवारी लोकसेवा मंडळाच्यावतीने घोषित करण्यात आली,