अखेर बनावट ॲप द्वारे फसवणूक करण्याऱ्या वर शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अखेर बनावट ॲप द्वारे फसवणूक करण्याऱ्या वर शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शनिशिंगणापूर देवस्थानच्या बहुचर्चित बनावट ॲप द्वारे ऑनलाइन व्हीआयपी दर्शन पूजा अभिषेक व तेल चढावा फसवणूक प्रकरणी शनेश्वर देवस्थान यांनी फिर्याद देण्यास टाळाटाळ केल्याने अखेर सायबर पोलीस विभागाने स्वतः फिर्याद देऊन पाच बनावट ॲप धारक व मालक या अज्ञात व्यक्तीविरोधात शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदाम काकासाहेब काकडे पोलीस उपनिरीक्षक सायबर पोलीस अहिल्या नगर यांनी फिर्याद दिली असून सदर फिर्यादीवरून पूजा परिसेवा, घर मंदिर, हरी ओम ऑनलाईन प्रसाद, ई पूजा या ॲप धारक मालक यांनी शनेश्वर देवस्थान व धर्मदाय आयुक्त यांची ऑनलाइन व्हीआयपी दर्शन पूजा अभिषेक व तेल चढावा बुकिंग करिता कोणताही अधिकृत परवानगी घेतला नाही व शनेश्वर देवस्थानला देणगीने देता सदर यु आर एल संकेतस्थळ चे मालक धारक यांनी त्यांच्या साथीदारासह शनिशिंगणापूर येथील शनि महाराजांच्या शिळेचा फोटो व शनी मंदिराचा व महाद्वाराचा फोटो वापरून तसेच संकेतस्थळ धारक मालक यांचे कोणतेही अधिकृत पुजारी क्षणिक शिंगणापूर उपलब्ध नसताना देखील त्यांनी त्यांचे पुजारी यांच्यामार्फत शनि देवाची पूजा अभिषेक व तेल चढावा केला जाईल असा खोटा मजकूर फसवणुकीच्या उद्देशाने संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन प्रसारित केला आहे आरोपी यांनी ऑनलाईन पद्धतीने भाविकांकडून अनियमित दराने स्वतःच्या फायद्यासाठी रकमा स्वीकारल्या.
शनेश्वर देवस्थान व भाविकांची फसवणूक केली आहे याबाबत शनेश्वर देवस्थान चे सुरक्षा अधिकारी गोरख भीमाशंकर दरंदले व देवस्थानचे कार्यकारी अधिकारी कळूनही देवस्थानने अज्ञात साथीदार व आरोपी यांच्या विरोधात फिर्याद देण्यास टाळाटाळ करून शनिशिंगणापूर पोलीस ठाणे आगर कोणत्याही पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद न दिल्याने सदर प्रकरणाचे संवेदनशील व भाविकांच्या भावनाशी संबंधित असल्याने भाविकांची व संस्थांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी यांनी फिर्यादी यांना शनिश्वर देवस्थान संबंधात वरील तक्रारीनुसार अनुषंगाने भाविकांची ओळख देवस्थानची फसवणुकीच्या अनुषंगाने फिर्यादीवरून शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेदाम सायबर पोलीस अहिल्यानगर करत आहेत.



