गुन्हेगारी

विशेष पथकाचा कुंटणखान्यावर छापा;टाकून १७ महिलांचीकेली सुटका

विशेष पथकाचा शेवगावाच्या कुंटणखान्यावर छापा;टाकून १७ महिलांचीकेली सुटका

 

शेवगावमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकाने छापा टाकून १७ पीडित महिलांची सुटका केली आहे. याबाबत चार जणांवर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बनावट ग्राहक बनून छापा* 

पाच हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (ता.१७) रात्री दहा वाजता केली. शबाना सय्यद पठाण, गणेश लक्ष्मण शिंदे, गणेश अंबादास पाचे, राहुल अरुण गर्जे (सर्व रा. शेवगाव, जि. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. विशेष पोलीस पथकातील पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना मिळालेल्या माहितीनुसार शेवगाव शहरातील शिवनगर परिसरात अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक बनून छापा टाकला. या कारवाई १७ पीडित महिलांची सुटका करण्यात असून पोलीस गीतांजली विजय पाथरकर यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सुंदरडे, महिला पोलीस कल्पना गावडे, प्रियांका हरिदास निजावे, सविता शिंदे, राहुल आठरे, भरत अंगरखे, राहुल गुंजाळ, दिनेश मोरे, शंकर चौधरी, दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, अक्षय भोसले, सुनील पवार यांच्या पथकाने कारवाई केली.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे