कृषीवार्ता

जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऊसतोड यंत्राला कर्जपुरवठा – मुरकुटे

जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऊसतोड यंत्राला कर्जपुरवठा – मुरकुटे

भविष्यात साखर कारखान्यांना ऊस तोडणी मजुरांचा तुटवडा भासणार आहे. महाराष्ट्रात हार्वेस्टरला (यंत्र) मागणी वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी दिली आहे.

ग्रामपंचायतीच्या तर्फे विविध विकास कामांचा शुभारंभ व ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार यांचा लोकसेवा मंडळात प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी मुरकुटे बोलत होते.

मुरकुटे पुढे म्हणाले की, हार्वेस्टर खरेदीसाठी लागणाऱ्या रकमेच्या ७० टक्के रक्कम जिल्हा बँक कर्जस्वरूपी देणार आहे. शेतकऱ्यांनी हार्वेस्टर खरेदी केल्यास अशोक कारखान्याच्या तर्फे यंत्र चालविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले. त्याचबरोबर यंदा पाऊस मोठ्या प्रमाणात पडू शकतो परिणामी सर्व शेतकरी बांधवांनी खरीप पिकांचे विमे उतरवून घ्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी करून गांडूळ खत प्रकल्प सुरू करावे असेही उपस्थित शेतकर्‍यांना सुचविले.

या कार्यक्रमास अशोकचे व्हा चेअरमन भाऊसाहेब कहांडळ, माजी व्हा.चेअरमन ज्ञानदेव साळूंके, माजी संचालक लक्ष्मण(भाऊ)थोरात, शेतकरी संघटनेचे सुभाष पटारे, संचालक यशवंत रणनवरे, शिवाजीराव शिंदे, माजी उपसरपंच पाराजी पटारे, शंकरराव पवार, दिपक पवार, दत्तात्रय नाईक, ग्रा.पं.सदस्य मयूर पटारे, सुनिल बोडखे, शिवाजी पवार, मल्हार रणनवरे, भाऊसाहेब पटारे, धनराज कोकणे, मच्छिंद्र कोकणे, संदीप कोकणे, भाऊसाहेब कोकणे, भास्करराव कोकणे, रावसाहेब वाघुले, आबा आहेर, बाळासाहेब आहेर, बबलू वाघुले, भागवत रणनवरे, सुभाष येवले, पोपट जाधव, अशोक तुवर, रंगनाथ कोकणे, विजू शिंदे, दादासाहेब कापसे, तुकाराम बोडखे, बाळासाहेब जगताप, संजय पटारे आदी उपस्थित होते.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे