गुन्हेगारी

शाळकरी व महाविद्यालयीन मुलींना फसवून त्यांचे धर्मांतर करण्याच्या गंभीर प्रकारास विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या हाणामारीत महाविद्यालयाच्या आवारातच चॉपर ने विद्यार्थ्यांना धमकी.

शाळकरी व महाविद्यालयीन मुलींना फसवून त्यांचे धर्मांतर करण्याच्या गंभीर प्रकारास विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या हाणामारीत महाविद्यालयाच्या आवारातच चॉपर ने विद्यार्थ्यांना धमकी.

 

 

*कोपरगाव(प्रतिनिधी):-शाळकरी व महाविद्यालयीन मुलींना लव जिहाद मध्ये फसवून त्यांचे धर्मांतर करण्याच्या वाढत्या प्रकारांना तीव्र विरोध होत असतानाच महाविद्यालयीन जबाबदार व्यक्तीलाच प्रेमाच्या जाळ्यात फसवून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जिहादी प्रियकराच्या प्रेमाखातर या व्यक्तीने बळजबरीने नमाज पठण करून त्यांचे धर्मांतर करण्याच्या चालू असलेला गंभीर प्रकारास विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या हाणामारीत  जिहादी प्रियकराने महाविद्यालयाच्या आवारातच चॉपर ने विद्यार्थ्यांना धमकावण्याच्या प्रकारामुळे यासर्व गंभीर प्रकारचे बिंग फुटल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.* 

                  याबाबतची खळबळजनक व सविस्तर समजलेली माहिती अशी की,कोपरगाव शहरातील एका महाविद्यालयातील जबाबदार व्यक्तीला जिहादी प्रवृत्तीच्या युवकाने प्रेमाच्या जाळ्यात फसवले.प्रेम आंधळे असते त्या उक्तीप्रमाणे ही व्यक्ती सुद्धा त्या युवकाच्या प्रेमात पागल झाली तो युवक त्या व्यक्तीच्या घरातच रहात असल्याचीही माहितीही चर्चेतून समोर आली आहे.त्या जिहाद्याच्या प्रेमात पागल झालेल्या व्यक्तीच्या प्रेमासाठी वाट्टेल ते करायला तयार होत्या आणि त्या जिहाद्यालाही तेच हवे होते.जिहादीच्या प्रेमासाठी प्रेयसी असलेल्या व्यक्तीने हिंदू विद्यार्थ्यांना जबरदस्तीने नमाज पठण करण्यास भाग पाडने व त्यांचे अगदी शांत डोक्याने धर्मांतर करण्याचा गंभीर प्रकार वर्षांपासून चालू होता.याप्रकारावरून याअगोदरही महाविद्यालय आवारात वादविवाद झालेले आहेत पण त्याकडे कोणीही गांभीर्याने न पाहील्याने हे गंभीर प्रकार बिनधास्तपणे आजपर्यंत चालूच होते.महाविद्यालयात जिहाद्यांचाही वाढत चाललेला वावर आज नमाजला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांना जबाबदार व्यक्तीच्या प्रियकराने चॉपर ने मारहाण करण्यापर्यंत गेल्याने हिंदुत्ववादी संघटना सतर्क झाल्या असून जिहाद्यांचा माज मोडून काढल्याशिवाय शांत बसायचे नाही असा आक्रमक पवित्रा संघटनांनी घेतल्याने वातावरण गरम झाले आहे.

                                 एक वर्षांपासून जबाबदार व्यक्ती च्या मुकसंमतीने महाविद्यालयात जिहादी चळवळीने डोके वर काढले असून विद्यार्थ्यांना धमकावणे जबरदस्तीने नमाज पठण करण्यास भाग पाडने तसं नाही केलं तर मारहाण करण्याचे प्रकार घडत होते यासर्व प्रकारांना विरोध केल्यास महाविद्यालयातुन बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या जबाबदार व्यक्तीच्या धमकीमुळे मुलेही ते आजपर्यंत निमूटपणे सहन करत आले आहेत.या प्रकारावरून विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या वादावादीकडे कोणीही गांभीर्याने आजपर्यंत बघितले नाही आणि त्याचाच फायदा जिहादी आणि त्याच्या प्रियसी असलेल्या जबाबदार व्यक्तीने घेतल्याने हे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून महाविद्यालय परिसरात जबाबदार व्यक्ती यांच्या मर्जीने नमाज पढण्या इतपत हिंमत जिहाद्यांची गेल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तो गंभीर प्रकार वेळोवेळी संस्था चालकांना सांगितला परंतु त्यावर संस्थेने ठोस अशी कोणतीही कारवाई न केल्याने जिहादी प्रवृत्ती आणखीनच सोकावली त्याचे परिणाम आज समोर आले.

                      महाविद्यालय प्रांगणात मागील याच गंभीर कारणावरून काल विद्यार्थ्यांच्या दोन गटात वादावादी झाली त्याचे परिणाम किरकोळ हाणामारीत झाले.ते वाद सोडवण्या ऐवजी जबाबदार व्यक्तीने तिच्या जिहादी प्रियकराला परिस्थिती हाताळण्यासाठी बोलावून घेतले आणि तो बहाद्दर ही हातात चॉपर घेऊन महाविद्यालयाच्या आवारात घुसला जबाबदार व्यक्तीचा जिहादी प्रियकर चॉपर काढून विद्यार्थ्यांना धमकावू लागल्याने विद्यार्थी पुरते घाबरून,जिवाच्या भीतीने सैरभैर पळू लागले.घडलेला गंभीर प्रकार समजल्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी ताबडतोब महाविद्यालयात जाऊन जिहादी प्रवृत्तीच्या प्रियकर युवकाला बेदम चोप देऊन चॉपरसह पोलीस ठाण्यात दाखल केल्याने पूढील गंभीर अनर्थ टळला. नमाज पठणास विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर झालेल्या वादाच्या कारणावरून जबाबदार व्यक्ती  यांनी बाहेरील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जिहाद्याला बोलावून चॉपरने विद्यार्थ्यांना धमकावणे महाविद्यालयीन नियमाच्या विरुद्ध व विद्यार्थ्यांचे बळजबरीने धर्मांतर करण्यास भाग पाडण्याचा गंभीर प्रकार आहे.हिंदू विद्यार्थ्यांकडून बळजबरीने नमाज पठण करून घेण्यासारखे गंभीर प्रकार होऊनही संस्था चालक बघ्याची भूमिका घेत असेल तर अशा आरोपींवर संस्था चालकांनीच गुन्हा दाखल केला पाहिजे या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या रेट्यापुढे संस्थेने पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार केली आहे.त्यानुसार जिहादी प्रवृत्तीच्या लोकांवर महाविद्यालयीन परिसरात बेकायदा नमाज पठण करणे व बेकायदेशीर हत्यार आणून धमकवण्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते.तर प्राचार्य या महत्वाच्या पदावर राहूनही महाविद्यालयीन जबाबदार व्यक्ती यांनी जिहादी प्रेमीच्या प्रेमाखातर विद्यार्थ्यांना बळजबरीने नमाज पठण करण्यास लावणे व जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडण्याचा गुन्हा प्राचार्या यांच्यावर दाखल झाला आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे