आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजन

सुजाता इंटरनॅशनल स्कुल येथे कृष्णजन्माष्टमी व दहीहंडी उत्सव आनंदात साजरा*_ 

_*सुजाता इंटरनॅशनल स्कुल येथे कृष्णजन्माष्टमी व दहीहंडी उत्सव आनंदात साजरा*_ 

 

सोनई (7 सप्टेंबर) रोजी सुजाता इंटरनॅशनल स्कुल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या विद्यालयात कृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सकाळ वृत्तपत्र समूहाचे जेष्ठ पत्रकार श्री विनायक तात्या दरंदले, डॉ शुभम गडाख, संकेत कराळे व संस्थापक श्री.किरण सोनवणे सर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्णाच्या आरतीने सुरु करण्यात आली दरम्यान शिक्षकांनी विविध देखाव्यातून श्रीकृष्णाच्या विविध लीला दाखवल्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे विविध वेशभूषेतील विद्यार्थी होते यामध्ये जणू शाळेला गोकुळ नगरीचा रूप प्राप्त झालं होतं 

        या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषणे, श्रीकृष्णाच्या हिंदी व मराठी गीतांवर नृत्य तसेच गीत गायन आदी विविध कृतीत भाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील इयत्ता 9 वी च्या विद्यार्थिनी श्रुष्टी आंधळे आणि ऊजमा शेख यांनी श्रीकृष्ण आणि राधाच्या भूमिकेतून केले .

शाळेचे संस्थापक श्री किरण सोनवणे सर यांनी विद्यार्थ्यांना कृष्णजन्माष्टमी च्या शुभेच्छा दिल्या तसेच शाळेतील शिक्षकांनी भाषणातून श्रीकृष्णाचे जीवन चरित्र समजावून सांगितले तसेच दहीहंडी उत्सव म्हणजे काय ते सांगितले व विविध भजने आणि गवळणी सादर केल्या 

  कार्यक्रमाची सांगता दहीहंडी ने झाली यामध्ये इयत्ता 7 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांनी मानवी मनोरा करून दहीहंडी फोडली या दहीहंडी कार्यक्रमात इयत्ता 11 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांनी गोविंदाच्या भूमिकेतून थरांवर थरांची सलामी दिली रिमझिम पावसाच्या थरात गोविंदानी संगीताच्या तालावर नृत्य करून दहीहंडी फोडली व सर्व विद्यार्थ्यांना गोपाळकाला वाटप केला .कार्यक्रमाला पालकांची उपस्थिती उल्लेखनीय होती पावसाच्या सरीत पालकांनी ही दहीहंडी चा कार्यक्रम पहिला व प्रसाद घेतला संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील शिक्षक रोहित लहाड सर यांनी केले होते

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शाळेतील स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले.

1/5 - (1 vote)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे