जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूलाचे दर्जेदार काम करावे… आमदार लहू कानडे…

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूलाचे दर्जेदार काम करावे… आमदार लहू कानडे…
टाकळीभान प्रतिनिधी: जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पूलाचे काम दर्जेदार व चांगल्या पद्धतीने केले तरच तो पूल जास्त दिवस टिकेल.असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी गुजरवाडी- खिर्डी रस्त्यावर पडलेल्या भगदाडाच्या भूमीपूजन प्रसंगी केले.आमदार श्री लहू कानडे मा. सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक यांच्या हस्ते सदरच्या कामाचे भमिपूजन करण्यात आले. खिर्डी गुजरवाडी रस्त्यावरुन गणेशखिंड देवस्थानला जोडणाऱ्या व टाकळीभान कडे जाणाऱ्या रस्त्यावर भंडारदरा धरणाच्या कालव्याच्या पुलावर पडलेले मोठे भगदाड अत्यंत धोकादायक झाले होते…येथील ग्रामस्थ व देवस्थानला येणाऱ्या भाविक भक्तगणासाठी हा महत्वाचा रस्ता असल्याने सदरचे काम अपघातांचा धोका टाळण्यासाठी अत्यंत महत्वाचे होते..या बाबीचा विचार करून आमदार श्री लहू कानडे साहेब यांनी सदरचे काम तातडीने मंजुर करून घेतले. या भगदाडावर मा. सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे आंदोलन करून तातडीने काम करण्याच्या सूचना करून जलसंपदा विभागाला या संदर्भात निवेदन ही दिले होते तसेच या कामी अशोक नाना कानडे यांनी सदर कामाचा पाठपुरावा चांगल्या पद्धतीने केला.
सदर कार्यक्रमासाठी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्र्वर मुरकुटे, अशोक नाना कानडे, विष्णुपंत खंडागळे, राजेंद्र कोकणे भाऊसाहेब पारखे, भरत जाधव,अर्जुन राऊत, आबासाहेब रणनवरे, सुंदर रणनवरे,सुरेश पवार, हरीभाऊ बनसोडे, योगेश आसने, मच्छिंद्र मासाळ, संदीप जाधव, भास्कर तुवर, रवींद्र तुवर तसेच जलसंपदा विभागाचे उपअभियंता श्री संजय कल्हापुरे , उप अभियंता महेश शेळके , आदी उपस्थित होते.