वडगाव ढोक निवडणुकीत काय होणार? सचिन दादा ढाकणे की रमेश नेहरकर यांचा ‘हा’ निर्णय*

*वडगाव ढोक निवडणुकीत काय होणार? सचिन दादा ढाकणे की रमेश नेहरकर यांचा ‘हा’ निर्णय*
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बीड जिल्ह्यात 704 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. ही निवडणुक दिग्गजांनी प्रतिष्ठेची केलीय. विशेषतः गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक या ग्रामपंचायतीकडे सर्वांचं विशेष लक्ष आहे. सचिन दादा आणि रमेश नेहरकर हे दोघेही प्रचारात उतरले आहेत.
गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भावी आमदार विजयसिंह पंडित यांच्या तालुक्यातील वडगाव ढोक हे गाव आहे.
या निवडणुकीत पहिल्यांदाच दोघांचेही उमेदवार रिंगनात उतरले आहे त्यामुळे गेवराई तालुक्यात याची चर्चा केली गेली. सरपंच पदासाठी सचिन दादा ढाकणे व रमेश नेहरकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
सरपंच पदाची निवडणूक सचिन दादा ढाकणे ऊर्फ रमेश नेहरकर आहे. मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दादा ढाकणे यांनी त्यांना निवडणुकीत आवाहन दिले आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची बनलीय.
मागील दोन टर्म पासून राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या ताब्यात वडगाव ढोक ग्रामपंचायत आहे दहा पैकी नऊ सदस्य हे निवडनुक लढत आहेत . राष्ट्रवादीचे दोन्ही कडील उमेदवार आहेत.
सरपंच पदासाठी दोन्ही गटात एक मत असले तरी वंचितच्या उमेदवारामुळे इथे सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक आता प्रतिष्ठेची बनलीय. या दोघांनीही प्रचाराचा धडाका सुरूच ठेवलाय.
राज्यातील 7751 ग्रामपंचायतींसाठी येत्या 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.
राज्यातील अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, दोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर आदी जिल्ह्यांतील गावांमध्ये या निवडणुका पार पडतील.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, आष्टी, बीड, धारुर, गेवराई, केज, माजलगाव, परळी, पाटोदा, शिरूर कासार, वाडवणीत ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत.