नोकरी

तलाठी नसल्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ व शाळकरी मुलामुलींना अनेक अडचणीं

तलाठी नसल्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ व शाळकरी मुलामुलींना अनेक अडचणीं

 

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील तलाठी कार्यालयात कामगार तलाठी नसल्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ व शाळकरी मुलामुलींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे या बाबत तहसिलदार प्रशांत पाटील यांनी तातडीने कायम स्वरुपी कामगार तलाठी यांची त्वरीत नियुक्ती करावी अशी मागणी तमाम जनतेतून होत आहे

       श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान लोकसंख्येच्या मानाने मोठे गाव असून, गावात तलाठी कार्यालय, व विशेष म्हणजे मंडलाधिकारी कार्यालय उपलब्ध असतांना देखील शेतकर्‍यांना कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी सात बारा उतारे ,रहिवाशी दाखले,उतपन्नाचे दाखले आदी कामांसाठी दहा किलोमीटर माळवाडगाव याठिकाणी कामगार तलाठी कार्यालयात जावे लागते ही मोठी गावाच्या दृष्टीने शोकांतीका आहे. तसेच तलाठी कार्यालयात गावातील व इतर गावातील खाजगी व्यक्ती नको या वादविवादात राजकीय पक्ष व विविध संघटना यांच्या वतीने दिल्या जाणार्‍या निवेदनाद्वारे सरकारी अधिकारी येथे सेवा देण्यास तयार नसल्याचे सध्या चित्र दिसून येत आहे.तरी या सर्व बाबींचा विचार करून तहसिलदार पाटील यांनी लक्ष घालून गावासाठी कायम स्वरूपी कामगार तलाठी यांची नियुक्ती करावी अशी मागणी तमाम ग्रामस्थांच्या वतीने होत आहे

                             

    आज मला व काही ग्रामस्थांना 7/12 उतारा,रहिवाशी,व उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी माळवाडगावला जावे लागले माळवाडगावला जावे लागले याचे दूःख नाही मात्र आपल्या गावात तलाठी कार्यालय असतांना दुसर्‍या गावात जावे लागले ही मोठी खेदाजनक बाब आहे अशी परखड प्रतिक्रिया सेवा सोसायटीचे माजी चेअरमन राहुल पटारे यांनी केली आहे

4/5 - (5 votes)
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे