अपघातकृषीवार्ता

वादळी वार्‍यासह जोरदार अवकाळी पाऊस. गहू पिके भूईसपाट.1 गाई व 1शेतकऱ्याचा विज पडून मृत्यू

टाकळीभान येथे वादळी वार्‍यासह जोरदार अवकाळी पाऊस. गहू पिके भूईसपाट.1 गाई व 1शेतकऱ्याचा विज पडून मृत्यू

 

 

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे आज दिनांक १८मार्च रोजी दुपारी ४.३० च्या दरम्यान वादळी वार्‍यासह जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने गहू, मका, कांदा आदी पिके भुईसपाट झाली आहेत त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

          गेल्या दोन दिवसांपासून येथे साधारण अवकाळी पाऊस सुरू आहे मात्र काल रात्री व आज दिनांक१८ मार्च रोजी आर्धा तास वादळी वार्‍यासह जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने उभी पिके भूईसपाट झाली आहेत.           

        सध्यस्थितीत रब्बी हंगामातील अनेक शेतकर्‍यांची गहू पिके उभी असून ही पिके काढणीस आली आहेत. तसेच कांदा, मका आदी पिके उभी असून या झालेल्या अवकाळी पावसाने उभ्या पिकांना मोठा फटका बसला असून गहु पिक या वादळी पावसाने भुईसपाट झाल्याचे चित्र विविध ठिकाणी दिसून येत आहे.

            एकीकडे वाढता उत्पादन खर्च व खराब हवामानामुळे घटलेले उत्पादन या समस्येला तोंड देत असतांनाच अशा आलेल्या या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचा तोंडी आलेला घास हिरावून घेतला असून या नुकसानीचे प्रशासनाने पंचनामे करावे अशी मागणी शेतकर्‍यांमधून करण्यात आली आहे. या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची सुचना तहसिलदार प्रशांत पाटील यांनी कृषी अधिकारी यांना केली आहे.  

                              

आज झालेल्या अवकाळी पावसात खोकर येथील राजेंद्र नामदेव मोरे वय ५० वर्ष या व्यक्तीच्या व एका गायीच्या अंगावर वीज पडल्याने एक गाय व राजेंद्र मोरे यांचा मृत्यू झाला आहे.

                      

टाकळीभान— येथे झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने उभी पिके भुईसपाट झाली आहेत. खोकर येथे वीज पडून एक गाय व एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

 

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे