शिवजयंतीच्या पुण्यदिनी शहर आज शिवमय झाले असून कट्टर हिंदुत्ववादी नेते आ. टी राजा भैय्या यांची सभा आजचे प्रमुख आकर्षण आहे.*

शिवजयंतीच्या पुण्यदिनी शहर आज शिवमय झाले असून कट्टर हिंदुत्ववादी नेते आ. टी राजा भैय्या यांची सभा आजचे प्रमुख आकर्षण आहे.*
राष्ट्रीय श्रीराम संघाने आयोजित केलेल्या शिवजयंती निमित्त आज आ. टी राजाभैय्या श्रीरामपुरात येणार असून तेलंगाणा राज्यातील गोशामहल मतदारसंघाचे आमदार असलेले टी राजाभैय्या यांची राजकीय कारकीर्द पहिल्या दिवसापासूनच आक्रमक राहिलेली आहे मुस्लिम बहुल भागातूनही मतांवरील त्यांची पकड जराशीही ढिली पडलेली नाही.हिंदुत्व नसानसात ठासून भरलेल्या टी राजा भैय्यांनी आरएसएस बजरंग दल या संघटनांच्या माध्यमातून कार्याला सुरुवात केली तर तेलंगणात गोहत्या जवळजवळ त्यांच्या धाकानेच बंद झालेली आहे.जुन्या हैद्राबादमध्ये एक्कावन्न फूट उंच श्री. हनुमानाची मूर्ती बहुसंख्य मुस्लिम राहत असलेल्या भागात स्थापन करून हिंदुत्वाला त्यांनी चालना दिलेली आहे.नगरसेवक ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास हा पुर्णतः हिंदुत्व याच मुद्द्यावर आजतागायत अखंडपणे चालू आहे.टायगर या टोपण नावानेच ओळखले जाणारे टी राजा भैय्या यांचे हिंदुत्ववादी कार्य खरोखरच वाघासारखेच आहे.
आज होणाऱ्या त्यांच्या सभेसाठी स्वारद फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शरदभाऊ मोहोळ व हिंदू धर्म रक्षक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष योगी सनीनाथजी महाराज हे आवर्जून उपस्थित राहणार असून छत्रपती शिवाजी चौकात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा,अहमदनगर चे नामांतर करून अहिल्यादेवी नगर ,लव जिहादवर कठोर कायदा करावा तसेच भारत हिंदुराष्ट्र म्हणून घोषित व्हावे या प्रमुख मागण्यांवर त्यांचे आक्रमक शैलीत भाषण होणार असून त्यांच्या आक्रमक संवादमाऱ्याचे असंख्य चाहते आहेत.
गेल्या महिनाभरापासून या कार्यक्रमाची जय्यत तयारी चालू असून राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागरभाऊ बेग ,संस्थापक अध्यक्ष आकाशभाऊ बेग,सोनूभाऊ बेग यांच्यासह श्रीराम संघाचे असंख्य कार्यकर्ते ,पत्रकार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.