महाराष्ट्र

शनिप्रसाद गोशाळेच्या कार्याध्यक्षा अंजली एकनाथ पठाडेंचा महिलादिनी झाला सन्मान

शनिप्रसाद गोशाळेच्या कार्याध्यक्षा अंजली एकनाथ पठाडेंचा महिलादिनी झाला सन्मान

————————————————-

महिला दिनानिमित्त बीड जिल्हा पोलीस दलाचा पुढाकार

 

जागतिक महिला दिनानिमित्त बीड जिल्हा पोलिस दलाच्या वतीने “स्त्री शक्ती मंथन कार्यशाळा” 

 

या कार्यक्रमात ३० कर्तृत्वान यशस्विनींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथील शनिप्रसाद गोशाळेच्या कार्याध्यक्षा सौ.अंजली एकनाथ पठाडे यांचा गोशाळेत सेवाभावीवृत्तीने केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल बीडच्या खा.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश साबळे, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सचिन पांडकर, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे सह आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या

     

बीड जिल्हा पोलीस दलाकडून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात कर्तृत्ववान कार्य करणाऱ्या ३० महिलांचा बुधवार दि.८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सन्मान करण्यात आला.यामध्ये गेवराई तालुक्यातील श्री क्षेत्र राक्षसभुवन येथील शनिप्रसाद गोशाळेच्या कार्याध्यक्षा सौ.अंजली एकनाथ महाराज पठाडे यांचा गोशाळेच्या माध्यमातून सेवाभावीवृत्तीने केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. सौ.अंजली एकनाथ पठाडे या गोसेवेचे उत्तम कार्य करीत आहेत. कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या शेकडो गाईंना वाचवून त्या शनिप्रसाद गोशाळेत त्यांचा सांभाळ करत आहेत. कत्तलीपासून वाचवलेले पशुधन सांभाळणारी त्यांची जिल्ह्यातील पहिली गोशाळा आहे. तसेच दूध न देणाऱ्या भाकड गायी आणि वृद्ध झालेले बैल अशी शेकडो पेक्षाही जास्त गोवंशाचा त्या सांभाळतात. शनिप्रसाद गोशाळेचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.तिर्थराज महाराज पठाडे, सौ.पुष्पाबाई तिर्थराज पठाडे, एकनाथ महाराज पठाडे, कु.ज्ञानेश्वरी एकनाथ पठाडे, हरि,ओम एकनाथ पठाडे यांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभते आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे