कृषीवार्ता

सरकारी धोरणाच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांची बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर कांद्याची होळी

सरकारी धोरणाच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांची बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर कांद्याची होळी

 

तहसीलदारांना निवेदन, कांद्याला हमी भाव बांधून देण्याची मागणी

 

श्रीरामपूर : कांद्याच्या खरिदी भावात प्रचंड प्रमाणात घसरण झाली असून शेतकऱ्यांनी कांदा पीकासाठी केलेला खर्चही फिटेनासा झाला आहे.घसरलेल्या कांद्याच्या भावामुळे शेतकरी प्रचंड तणावाखाली मार्गक्रमण करत आहेत जगभर कांद्याला चांगली मागणी असताना देखील सरकारच्या वतीने शेजारील बांगलादेश , श्रीलंका,पाकिस्तान आदी देशांकडे कांदा खरेदी करण्याची ऐपत नसल्याने , कांदा निर्यातीला वाव नसल्याचे खोटे सांगण्यात येऊन कांद्यावर अप्रत्यक्ष निर्यात बंदी घातण्यात आली आहे. सरकारकडून कांदा,डाळी खाद्यतेल संभाव्य तुटवडा जाणवताच बाहेरील देशाकतून चढ्या भावाने आयात केली जाते. शेतकऱ्यांचे उत्पन्न केलेल्या शेतमालावर दुर्लक्ष करून दयामाया न दाखवता शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाते.सरकारची भूमिका कायम उत्पादकांऐवजी उपभोगत्याच्या बाजूने असते.सरकाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे आत्महत्येचे प्रमाण अधिक वाढत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा कृषिप्रधान देशाला लागलेला कलंक आहे. अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ हा शेतकऱ्यांचा गळफास ठरला आहे.या कायद्याचे नियम शेतकऱ्यांचे हिताचे नाहीत. कांद्याला हमीभाव द्यावा व कांदा निर्यात बंदी काढावी व कांदा बाहेरील देशातून आयात करू नये असे श्रीरामपूर तालुका दंडाधिकारी तहसीलदार साहेब यांना शेतकरी संघटनेच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले आहे.

तसेच कांदा मार्केट समोर होळी दहन करून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर जाहीर निषेद करण्यात आला आहे यावेळी संघटनेचे नेते व राज्य ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य बाळासाहेब पटारे, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष अहमदभाई जहागीरदार, जिल्हा उपाध्यक्ष विलास कदम, भोकरचे माजी उपसरपंच गणेश छल्लारे, शेतकरी नेते प्रतापराव पटारे, महाराष्ट्र कृषक प्रदेश संघटक भागचंद औताडे सर,शेतकरी युवा आघाडीचे उपाध्यक्ष संदीप उघडे, नेवासा तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब शिरसाट, मनोज हेलवडे, कानिफनाथ चव्हाण,गोरख लवांडे,कैलास पाटील, अहमदभाई शेख, बाजीराव ठोंबरे, शामराव बारसे, दत्तात्रय जानराव, बापुसाहेब राऊत, गोकुळ वमने,कैलास अबक, बाबासाहेब हरगुडे, भाऊदास बारसे, गिरीधर आसने, अशोकराव सलालकर,आदी कारेगाव, गोंडेगाव, भोकर, वडाळा महादेव, उक्कलगाव, एकलहरे, माळेवाडी, माळवाडगाव, भेर्डापूर,खिर्डी,वांगी, बेलपिंपळगाव, खोकर आदी गावातील शेतकरी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे