बेलापुरात एका मटका बहाद्दरावर पोलीसांची कारवाई

बेलापुरात एका मटका बहाद्दरावर पोलीसांची कारवाई
बेलापुर एस टी स्टँण्डच्या पाठीमागे एका टपरीच्या आडोशाला कल्याण नावाचा मटका खेळताना व खेळविताना एक इसम आढळून आला असुन पोलीसांनी गणेश हगवणे याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या बाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली माहीती अशी की बेलापुर एस टी स्टँंडच्या पाठीमागे गणेश हगवणे हा एका टपरीच्या आडोशाला कल्याण नावाचा मटका खेळवित असल्याची माहीती बेलापुर पोलीसांना मिळाली त्यांनी श्रीरामपुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या कानावर ही बाब घातली पोलीस निरीक्षक गवळी यांनी तातडीने कारवाई करण्याच्या सुचना दिल्या पोलीस हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे लोखंडे यांनी पंचासोबत छापा टाकला असता एस टी स्टँण्डच्या पाठीमागे एका टपरीत कल्याण नावाचा मटका खेळताना व खेळवीताना गणेश सोपान हगवणे वय ३५ वर्ष रा कुंभार गल्ली वार्ड नंबर तीन श्रीरामपुर आढळून आला पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ यांच्या तक्रारीवरुन गणेश हगवणे याच्यावर गुन्हा रजि. नबंर महाराष्ट्र जुगार अँक्ट कलम १२ अ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे