क्रिडा व मनोरंजन
सम्राट असंघटित बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने किरणताई जाधव यांचा सत्कार

सम्राट असंघटित बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने किरणताई जाधव यांचा सत्कार
सम्राट असंघटित बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त JD महाराष्ट्र NEWS चॅनलच्या मुख्यसंपादक किरणताई जाधव यांचा सम्राट संघटित संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत बागुल यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विलास अहिरे, शंकरराव बिराडे, सम्राट असंघटित सेवाभावी संस्थेचे सचिव श्री विलास जाधव, संस्थेचे उपाध्यक्ष मनोहर कोकाटे, संस्थेचे सल्लागार राहुल सोनवणे, संस्थेचे खजिनदार दत्तात्रय दांडगे, दीपमाला ताई जाधव तसेच संस्थेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सर्व उपस्थितांनी किरण ताईंना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी सर्वांचे आभार मानत मुख्य संपादक किरण ताई जाधव यांनी सर्व उपस्थितांना JD महाराष्ट्र NEWS चॅनल चे नवीन वर्ष 2024 चे कॅलेंडर वाटप केले.