बिटको महाविद्यालयात सायन्स असोसिएशनच्या वार्षिक उपक्रमांचे उद्घाटन संपन्न

बिटको महाविद्यालयात सायन्स असोसिएशनच्या वार्षिक उपक्रमांचे उद्घाटन संपन्न
नाशिकरोड: बिटको महावि्यालयातील सायन्स असोसिएशनच्या वार्षिक उपक्रमांचे उद्घाटन इन्स्टिटय़ुट ऑफ़ अॅस्टरोफिजीक्स बंगलोर आणि ऑल इंडिया पिपल्स सायन्स नेटवर्कचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रोफेसर डॉ. सब्यासाची चटर्जी यांचे हस्ते शनिवार दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी महाविद्यालयात संपन्न झाले.
प्रोफेसर डॉ. सब्यासाची चटर्जी यांनी या उद्घाटनप्रसंगी म्हटले की विज्ञान हे फक्त विज्ञान शिकणार्यांपुरते मर्यादित नसून सर्व मानवजात एकत्र ठेवण्यासाठी, सर्व विद्याशाखा एकत्र बांधण्यासाठी वैश्विक स्तरावर गरजेचे आहे. त्याच्या विकासासाठी एकात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. विज्ञानाची प्रगती ही टप्प्याटप्प्याने होते. साथीच्या रोगांचा सामना करण्यासाठी उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजना गरजेच्या आहे. तीव्र आजारांतून बरे होण्यासाठी योग, ध्यानधारणा अशा पर्यायी उपचारपद्धतींपेक्षा आहारावर नियंत्रण आणि योग्य औषधोपचार गरजेचे आहे असा मोलाचा संदेशही त्यांनी या प्रसंगी दिला. श्रोत्यांनी विचारलेल्या अवकाशशास्त्र संबंधित विविध प्रश्नांची उत्तरे देखील त्यांनी दिली.
महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा.डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी देखील या प्रसंगी मनोगत व्यक्त केले.
या उद्घाटनप्रसंगी सूत्रसंचालन आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायन्स असोसिएशनचे समन्वयक प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, पाहुण्यांचे स्वागत प्राचार्या मंजुषा कुलकर्णी, पाहुण्यांचा परिचय प्रा. दिनेश बोबडे आणि आभार प्रदर्शन प्रा. संजय पवार यांनी केले.