गुन्हेगारी
कर्जत तालुक्यातील शेगुड येथिल नेटके वस्तीवर भर दीवसा सहा तोळ सोनं लंपास..

कर्जत तालुक्यातील शेगुड येथिल नेटके वस्तीवर भर दीवसा सहा तोळ सोनं लंपास..
कर्जत तालुक्यातील शेगुड येथे आज दुपारी दिवसा एक वाजता अज्ञात चोरांनी घरी कोणीच नसल्याचा फायदा घेत दोन घरांचे कडी कोंयडे गजांच्या साह्याने फाकवून दतु नेटके व पंढरीनाथ नलवडे यांच्या घरातील सोने.व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली आहे.या घटनेचा तपास कर्जत पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव. लातुकर करत आहेत. कर्जत तालुक्यातील सर्व गावांमध्ये पोलिस पाटील यांना वारंवार सांगितले आहे की गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा राबविले गेली पाहिजे. असेही पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले.