महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय योजनांची लाभ देणारा चित्ररथ

*महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय योजनांची लाभ देणारा चित्ररथ आळंदीत*
*नायब निवासी तहसीलदार मदन जोगदंड यांची माहिती*
महसूल विभाग आणि उपविभागीय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमीत्त शेतकरी नागरिक यांना
शासनाच्या विवीध योजना त्यांची दारी येऊन देण्याची संकल्पना असलेल्या महसुल विभागाच्या चित्ररथाचे आज आळंदीत आगमन झाले, सात बारा बाबत तसेच शेतसारा आणि ईतर तत्सम माहितीचा विशेष लाभ नागरिकांनी घ्यावा यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त हे प्रयोजन केले असल्याचे ,नायब तहसीलदार मदन जोगदंड यांनी सांगीतले, खेड तहसील कार्यालय यांचा चित्र रथ आळंदीत आल्यानंतर त्याबाबत विशेष जनजागृती करण्यासाठी आळंदी महसूल विभाग च्या मंडळ अधिकारी स्मिता जोशी या त्यांच्या अधिकारी वर्गा समवेत हजर होत्या, श्री मदन जोगदंड निवासी नायब तहसीलदार खेड सौ स्मिता जोशी मंडल अधिकारी श्री राजेंद्र वडने तलाठी आळंदी, श्री ठाकूर भाऊसाहेब ,श्री बी बी पाटील तलाठी भाऊसाहेब चिंबळी, श्री बी जाधव तलाठी निघोजे, संतोष वीरकर,सचिन रणपिसे माजी नगराध्यक्ष राहुल चीतळकर. श्री संजय घुंडरे. भाजपा किसान मोर्चा. श्री सुनील रानवडे . नागरिक उपस्थित होते