राजकिय

टाकळीभान ग्रामपंचायतच्या वतीने गावात विविध विकास कामे सुरू.

 टाकळीभान ग्रामपंचायतच्या वतीने गावात विविध विकास कामे सुरू.

श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान ग्रामपंचायतच्या वतीने गावात विविध विकास कामे सुरू असून या कामांची पहाणी अशोक कारखान्याचे संचालक यशवंत रणनवरे, राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष मयुर पटारे, भाऊसाहेब पटारे, माजी उपसरपंच किशोर मैड, बाळासाहेब खुरूद, मंगेश पटारे यांनी केली आहे.

       सरपंच सौ.अर्चनाताई यशवंत रणनवरे यांच्या व लोकसेवा महाविकास आघाडीचे जेष्ठ नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली गावात विविध विकास कामे सुरू असून वेताळ महाराज मंदिर पेव्हिंग ब्लॉक बसविणे,

मुख्य पेठेत जाणारा व जगताप डॉक्टर यांच्या घरा समोरील रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, घोगरगाव रोड ते लक्ष्मी आई मंदिरा पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे, मारुती मंदिर वेस रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, महादेव मंदिर परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविणे आदी विकास कामे जोरात सुरू आहेत व 

लवकरच महादेव मंदिर परिसरात लोकांच्या मागणी वरून दशक्रिया विधीच्या ठिकाणी तीळ घेण्यासाठी खास ओट्याचे काम करण्यात येणार आहे.

        सुरू असलेली विकास कामे पुर्ण होताच ग्रामपंचायत सदस्य, लोकसेवा महाविकास आघाडीचे जेष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकारांच्या उपस्थितीत विकास कामांचा लोकार्पण कार्यक्रम करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य मयुर पटारे यांनी सांगितले.

     विकास कामांसाठी ग्रामस्थांचे मोठे सहकार्य मिळत सल्याने सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांच्या वतीने ग्रामस्थांना धन्यवाद देवून आभार मानण्यात आले आहे.

                     

टाकळीभान— येथील ग्रामपंचायतच्या वतीने गावात

विविध विकास कामे सुरू असून या कामाचीॅ पहाणी

करतांना यशवंत रणनवरे, राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष मयुर पटारे, भाऊसाहेब पटारे, किशोर मैड, बाळासाहेब खुरूद, मंगेश पटारे आदी.

 

 

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे