पाचेगाव ते लोखंडी सावरगाव डांबरीकरण रस्त्यासाठी रस्तारोको आंदोलन करणार- उपसरपंच सुनील जाधव*

*पाडळसिंगी ते पाचेगाव व पाचेगाव ते लोखंडी सावरगाव डांबरीकरण रस्त्यासाठी रस्तारोको आंदोलन करणार- उपसरपंच सुनील जाधव*
*गेवराई तालुक्यातील पाचेगाव सर्कल मध्ये रस्ते अभावी कित्तेकांचे जीव गमावले आहे, रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत दर वर्षी 8 ते 10 लोकांचा जीव गमावत आहे,जर हा रस्ता झाला तर,ज्या रस्त्यांमुळे लोकांचे जीव जाणार होते ते जाणार नाही*
*गेला कित्येक वर्षापासून पाचेगाव सर्कल मध्ये डांबरी रस्ते झालेले नाहीत,रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने या भागातील नागरिकांना दळणवळनास त्रास होत आहे*
*तात्काळ पाडळसिंगी ते पाचेगाव व पाचेगाव ते लोखंडी सावरगाव डांबरीकरण रस्ता करण्यात यावा या मागणीसाठी*
*दिनांक 10 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग NH 252 धुळे-सोलापुर हायवे पाडळसिंगी येथे रस्ता रोखण्यात येणार असून त्या अगोदर प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे*.
*जर डांबरीकरणाचा प्रश्न मार्गी लागलानाहीतर
तीव्र*
*आंदोलन वेगवेगळ्या स्वरूपात छेडण्यात येईल असे निवेदन*
*मा.जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आले आहे अशी माहिती सुनील जाधव (उपसरपंच जयराम तांडा) यांनी प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली*.